
सासरच्या छळाला कंटाळून उच्चशिक्षित विवाहितेची आत्महत्या
महिलेच्या कुटुंबीयांचा हत्या केल्याचा आरोप, एवढ्या लाखाची मागणी केल्याचा दावा, शशीसोबत त्या रात्री नेमके काय घडले?
भोपाळ – हुंड्याच्या छळाला कंटाळून एका उच्चशिक्षीत विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पण ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप महिलेच्या माहेरच्यांनी केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
मध्यप्रदेश मधील मैहरमध्ये नवविवाहित शशी मिश्रा हीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. एचडीबी फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या शशीचे लग्न 2023 मध्ये रीवा येथील सिमरीया येथे राहणाऱ्या अतुल मिश्रासोबत झाले होते. अतुल हा प्रायव्हेट बँकेत कामाला आहे. ते दोघे मैहरच्य हरनामपूर येथे भाड्याच्या घरात राहत होते. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पती पत्नीमध्ये कोणत्यातरी गोष्टीवरून वाद झाला. त्यामुळे अतुल रागाने बाहेर गेला. काही वेळाने तो परत आला त्यावेळी त्याला शशी कीटकनाशक घेताना दिसली. तो घरात येईपर्यंत शशीने विष्यप्राशन केले. त्यानंतर अतुलने शेजारी विजय तिवारी यांच्या मदतीने शशीला सिव्हिल मध्ये दाखल केले, पण तिने डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पण मृत महिलेचा भाऊ आणि कुटुंबीयांनी तिच्या पती आणि सासरच्या लोकांवर हुंड्यासाठी छळ आणि खून केल्याचा आरोप केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की हे लग्न २०२३ मध्ये झाले होते आणि तेव्हापासून पैशांची मागणी केली जात होती. शशीला यापूर्वीही अनेकदा मारहाण आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागले होते. अतुल आणि त्याचे कुटुंबीय १० लाख रुपये रोकड, प्लॉट आणि गाडीची मागणी करत होते, असाही आरोप केला आहे. विष घेण्याच्या काहीवेळ आधी शशी फोनवरून तिच्या आईशी बोलली होती, त्यावेळी तिने सांगितलं होतं की, तिचा नवरा मॅगी बनवत आहे आणि ती चपात्या टाकत आहे. मग अचनक ती आत्महत्या का करेल शिवाय घरात कीटकनाशक कोठून आले, असा सवाल उपस्थित केला आहे.
शशीला मॅगीतून विष दिल्याचा आरोप शशीच्या कुटुंबीयांनी केला आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणी अतुलला अटक केली असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.