Latest Marathi News
Ganesh J GIF

हिमानी तो प्रायवेट व्हिडिओ बनवून करत होती ब्लॅकमेल

हिमानी नरवाल हत्येचे गूढ उकलले, आरोपीचा धक्कादायक खुलासा, आईला वेगळाच संशय

रोहतक – हरियाणाच्या रोहतकमध्ये एका सुटकेसमध्ये सापडलेल्या मृतदेहाची अखेर ओळख पटली आहे. काँग्रेस नेत्या हिमानी नरवाल यांचा हा मृतदेह असल्याचं उघड झालं आहे. सुटकेसमध्ये हिमानी यांचा मृतदेह ठेवण्यात आला होता.

दिल्ली आणि हरियाणा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासांमध्ये काँग्रेस नेत्या हिमानी नरवाल यांच्या हत्येचा तपास करत आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलीसांनी बहादुरगड येथील रहिवासी सचिन याला अटक केली. आरोपीकडून धक्कादायक खुलासे करण्यात आले असून तो मोबाईल ॲक्सेसरीजच्या दुकानाचा मालक आहे. पोलिस चाैकशीतून हे स्पष्ट झाले की, हिमानी आणि सचिन हे रिलेशनशिपमध्ये होते. पोलिसांनी आरोपीकडून हिमानीचे दागिने आणि फोनही जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन आणि हिमानी एकमेकांना जवळपास एक ते दीड वर्षांपासून ओळखत होते. सचिन हिमानीच्या घरी कायमच येत बऱ्याचदा तो तिथे मुक्कामासाठीही राहत. सचिनचे अगोदरच लग्न झाले होते आणि दोन मुलांचा तो बाप आहे. सर्वकाही सुरळीत सुरू असताना अचानक हिमानीचा मृतदेह बस स्टँडवर एका बॅगमध्ये आढळून आला. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर मोठी खळबळ निर्माण झाली. सचिन आणि हिमानी यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. तिने सचिनला आपल्या घरी बोलावले. त्यानंतर त्यांचे शारीरिक संबंध निर्माण झाले. हैराण करणारे म्हणजे याचा व्हिडीओ हिमानी हिने बनवला आणि या व्हिडीओच्या माध्यमातून ती सचिनला ब्लॅकमेल करत होती. तीन लाखांपेक्षा जास्त रक्कम सचिनने हिमानीला दिली होती. ती आपल्यावर पैशांसाठी सतत दबाव टाकत असल्यामुळेच हत्या केल्याचे सचिनने सांगितले आहे. दरम्यान हिमानी नरवाल ही सध्या कायद्याचं शिक्षण घेत होती. तिची आई आणि भाऊ दिल्लीला तर शिक्षणामुळे हिमानी रोहतकमधील घरी एकटीच रहायची, तसेच ती काँग्रेसची सक्रिय कार्यकर्ता होता.

हिमानी नरवाल हत्या प्रकरणामुळे हरियाणामधील राजकीय वातावरण तापले आहे. हिमानीच्या कुटुंबीयांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तसेच सचिनने केलेले सर्व आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणात एखाद्या काँग्रेस नेत्याचा हात असण्याची शंका व्यक्त केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!