Latest Marathi News
Ganesh J GIF

भयंकर! भरधाव कारने पादचारी तरुणीला चिरडले

थरारक आणि भयानक अपघाताचा व्हिडीओ व्हायरल, तरूणीचा जागीच मृत्यू, बेजबाबदार कारचालकावर कारवाई होणार?

देहराडून – भारतात रस्ते अपघातात आजपर्यंत अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. जनजागृती आणि कारवाईचा इशारा देऊनही रस्ते अपघात कमी होताना दिसत नाहीत. आता उत्तराखंडमधील एका शहरात भरधाव कारने तरुणीला चिरडल्याची घटना घडली आहे.

उत्तराखंडमध्ये एक हृदयद्रावक रस्ता अपघात घडला आहे. रस्त्यावरुन जाताना एका तरुणीला भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. या घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की, संबंधित तरुणी पादचारी मार्गाने जात होती. रस्ता ओलांडत असताना एका भरधाव वेगाने येणाऱ्या कारने तिला जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर तरुणी कार खाली चिरडली जाते. काही क्षणात घडलेल्या या अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमते. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Sainiharsh841 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी बेजबाबदार कार चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

https://x.com/Sainiharsh841/status/1939563811037688282?re

आपण अनेकदा रस्त्यावरून चालत असताना समोरून वाहन चालवणारा जर बेजबाबदार असेल तर आपण असुरक्षित आहोत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. सध्या हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!