Latest Marathi News
Ganesh J GIF

भयानक! दोन बसच्या मध्ये सापडून रिक्षाचा चक्काचूर

भयानक आणि विचित्र अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल, रिक्षाचा चुराडा, भरधाव बस आली आणि....

चित्रदुर्ग – कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात एक विचित्र आणि धक्कादायक अपघाताची घटना समोर आली आहे. कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात दोन हायस्पीड बसच्या मधोमध एक ऑटो पुर्णपणे चिरडली गेली. याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाला आहे.

व्हिडिओमध्ये रस्त्यावर गर्दी दिसत आहे. बस, ऑटो आणि लोकांची वर्दळ दिसत आहे. भरधाव बस आधी जात आहे. बसच्या मागून एक ऑटो जात आहे. दरम्यान, ऑटोच्या मागून एक भरधाव बस जाताना दिसत आहे. भरधाव बस इतक्या वेगात येते की ऑटो पूर्णपणे चिरडला जातो. ती धडक इतकी जोरदार होती की, रिक्षा अक्षरशः एक लोखंडी गोळ्यासारखी गुंडाळली गेली. त्यामुळे रिक्षातील कोणीही जिवंत राहिले नसेल, असे वाटत असताना रिक्षातील सर्वजण जिवंत होते. स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत ऑटोमधील जखमींना वाचवण्याचा प्रयत्न केला. स्थानिक लोकांच्या मदतीनं सर्व जखमींना तातडीनं जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. रिक्षाचा चुराडा झाला असला तरीही सर्वजण सुरक्षित आहेत. या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

 

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच दोन्ही बस ताब्यात घेतल्या. सध्या पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे. पण या अपघातामुळे गावात खळबळ उडाली होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!