Latest Marathi News
Ganesh J GIF

भयानक! पाळीव कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात नवजात बाळाचा मृत्यू

कुत्रा हल्ला करतानाचा थरार सीसीटीव्हीत कैद, बाळाला वाचवताना मावशी गंभीर जखमी,कारवाईची मागणी

अहमदाबाद – गुजरातमधील अहमदाबाद एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील एका सोसायटीतील पाळीव कुत्र्याने लहान बाळावर हल्ला केल्याने मुलाचा मृत्यू झाला आहे. हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. पाळीव कुत्रा राॅटवीलर जातीचा होता.

अहमदाबादमधील एका सोसायटीतील एका महिलेने तिच्या लहान भाच्याला सोसायटीतील फिरण्यासाठी आणले होते. त्याचवेळी एक महिला तिचा राॅटवीलर कुत्र्याला फिरण्यासाठी घेऊन आली होती. ती फोनवर बोलत असताना कुत्रा अचानक आक्रमक झाला आणि ताब्यातून सुटून थेट बाळ आणि त्याच्या मावशीवर झडप घातली. दरम्यान, जवळच उभ्या असलेल्या आणखी एका महिलेने मुलाला वाचवण्यासाठी धाव घेतली. तिने ताबडतोब बाळाला हातात घेतले आणि तेथून निघून गेली. त्यानंतर बाळाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पण मानेवर खोलवर जखम झाल्याने बाळाचा मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येते, ज्यात मोठ्या आकाराचा रॉटवीलर कुत्रा बाळ आणि त्याच्या मावशीवर झडप घालताना दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे सांगितले आहे.

 

कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मावशीवर रूग्णालयात उपचार सुरु आहेत. अहमदाबाद महानगरपालिकेच्या नियमांनुसार, पाळीव कुत्र्यांची नोंदणी करणे अनिवार्य आहे. पण या कुत्र्याच्या मालकिणीने नोंदणी केली की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.बाळाच्या कुटुंबाने कुत्र्याच्या मालकाविरुद्ध पोलिस तक्रार दाखल केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!