
पतीने बाॅडी बिल्डिंगसाठी स्टेरॉइड्सचे सेवन केल्याने झाला नपुंसक
मा. मुख्यमंत्र्याच्या भाचीचा खळबळजनक खुलासा, पती आणि सासूवर आरोप, यासाठी टाकला दबाव
लखनऊ – बहुजन समाजवादी पक्षाच्या प्रमुख आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री यांच्या भाचीने आपल्या पतीसह सासरच्या सात जणांवर गंभीर आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मायावतींची भावी एलिसचा विवाह विशाल सिंग बरोबर ९ नोव्हेंबर २०२३ ला झाला होता. पण लग्न झाल्यापासून राजकीय दबावाचा वापर करत एलिसकडे हुंड्याची मागणी होऊ लागली. आरोपींनी एलिसकडे ५० लाख रुपये आणि गाझियाबादमधील इंदिरापुरा येथे एक फ्लॅट देण्याची मागणी केली. पण एलिसने नकार देताच तिला सतत मानसिक आणि शारिरिक त्रास देण्यात येत होता. एलिसने हापूस न्यायालयाच्या आदेशानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्यावर हुंड्यासाठी छळ झाल्याचा आरोप करताना एलिसने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. ती म्हणाली, तिचा पती विशाल सिंह लग्नाआधीपासून स्टेरॉइड्स घेऊन बॉडी बनवत होता, ज्यामुळे तो नपुंसक झाला होता. हे माहीत असूनही सासरच्या लोकांनी तिला माहिती न देता विवाह केला. कहर म्हणजे जेव्हा तिने सासू आणि नणंदकडे याबाबत विचारले, तेव्हा त्यांनी ‘मुलगा नसेल तर मोठ्या दिराकडून मूल करून घे’ असा संतापजनक सल्ला दिला. सासरे आणि मेहुण्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार करण्याचाही प्रयत्न केला. यानंतर पीडिता आई-वडिलांच्या घरी परतली. याबाबत पोलीस तक्रार करूनही कोणतीही कारवाई न झाल्याने पीडितेने न्यायालयात धाव घेतली. आता न्यायदंडाधिकारी डॉ. ब्रह्मपाल सिंह यांच्या निर्देशानुसार हापूड नगर कोतवाली पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. माझी आत्याबाई मायावती असूनही मला न्याय मिळत नव्हता. सासरच्या लोकांनी माझ्यावर इतका अत्याचार केला की, जीव वाचवण्यासाठी कोर्टाची मदत घ्यावी लागली, अशी प्रतिक्रिया एलिसने दिली आहे. विशेष म्हणजे पीडितेची सासू पुष्पा देवी या हापूड नगर परिषदेच्या माजी अध्यक्षा आहेत.
हापुड कोतवाली पोलीस ठाण्यात एलिसचा पती विशाल सिंह, सासरे श्रीपाल सिंह, सासू पुष्पा देवी, जेठ भूपेंद्र उर्फ मोनू, जेठाणी निशा, नणंद शिवानी आणि आतेसासरे अखिलेश यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. पुढील तपास सुरू केला आहे.