
मी मनसेच्या जावेद शेखचा मुलगा आहे, पैसे घे आणि जा’
मनसे नेत्याच्या मुलाची रस्त्यावर दादागिरी, अर्धनग्न अवस्थेत तरुणीला शिविगाळ, शिविगाळचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल
मुंबई – मनसेच्या एका पदाधिकाऱ्याच्या मुलाने मद्यधूंद अवस्थेत अर्धनग्न होऊन अभिनेत्री राजश्री मोरे हिला शिवीगाळ करत धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबतचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबईतील अंधेरीत रविवारी रात्री ही घटना घडली. यानंतर राजश्रीने घटनास्थळाचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या फुटेजमध्ये एक तरुण अर्धनग्न अवस्थेत असल्याचे दिसून आला आहे. राजश्री मोरेने मनसे नेते जावेद शेख यांचा मुलगा राहिल शेख याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. व्हिडिओत दिसत आहे की, राहिल अर्धनग्न अवस्थेत दिसत आहे, तो आक्रमक दिसत आहे आणि शिवीगाळ करताना ऐकू येते. क्लिपमध्ये एका ठिकाणी तो ‘माझे वडील मनसेचे राज्य उपाध्यक्ष आहेत’असं बोलताना दिसत आहे. तो राजश्रीला शिवीगाळ करत असल्याचं दिसतंय. …. पैसे घे. जा आणि पोलिसांना सांग मी जावेद शेखचा मुलगा आहे… मग काय होईल ते दिसेल अशा शब्दात राहिल शेख धमकी देताना दिसतो. या घटनेनंतर राजश्रीने राहिल जावेद शेखविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरचा फोटो शेअर केला आहे. राजश्रीने आरोप केला आहे की, स्थानिक मराठी समुदायाबद्दलच्या तिच्या अलिकडच्या टिप्पण्या आणि मराठी भाषा लादण्याबाबत सुरू असलेल्या वादामुळे तिला मनसे कार्यकर्ते आणि समर्थकांकडून लक्ष्य केले जात आहे. राजश्रीने राहिलविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. मनसे नेत्याच्या मुलाने नंतर त्याचे कान धरून माफी मागितली. आता हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. दरम्यान राजश्री मोरे ही महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील रहिवासी आहे. ती सध्या मुंबईत राहते.
राज्यात हिंदी आणि मराठी भाषा वादाच्या पार्श्वभूमीवर, राजश्रीने दावा केला होता की, स्थलांतरित शहर सोडून गेल्यास मुंबईतील स्थानिक मराठी लोकांची परिस्थिती आणखी बिकट होईल. तिच्या या वक्तव्यानंतर, मनसे कार्यकर्त्यांनी ओशिवरा पोलिस ठाण्यात राजश्री मोरे विरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर राजश्रीने माफी मागितली होती.