
माझी १५ लाख रुपयांची फसवणूक झालीय प्लीज मला मदत करा
रीलस्टारला दांपत्याने घातला १५ लाखाचा गंडा, दांपत्य फरार, पोलिसही दाद देईना, शोनाला कोसळले रडू
पुणे – सोशल मीडिया स्टार शोना इंगळे हिने आपली १५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे. नारायणगाव येथील देशपांडे दाम्पत्याने फसवणूक केल्याचा आरोप तिने फोटो शेअर करत केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची जोरदार चर्चा होत आहे.
नारायणगाव येथील मोहन देशपांडे आणि सायली देशपांडे या दाम्पत्यावर शोना इंगळे हिने गंभीर आरोप केले आहेत. या दांपत्याने आपण गरजू असल्याचे दाखवत आपल्याला गंडा घातल्याचा आरोप केला आहे. एक व्हिडिओ प्रसारित करत शोना इंगळे हिने या प्रकराची माहिती दिली आहे, ती म्हणाली माझ्याबरोबर खूप मोठा स्कॅम झाला आहे. प्लिज मला मदत करा, पोलीस मदत करत नाहीत आणि हे लोक सापडावेत, आणखी इतर कोणाची फसवणूक होऊ नये म्हणून मी हा व्हिडीओ पोस्ट करत आहे. हा व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. व्हिडीओ लाईक्स आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी नाही. माझी फसवणूक झाली, १५ लाखांची रक्कम थोडीथोडकी नाही,” असं सांगताना शोना इंगळेला आपले अश्रू रोखता आले नाहीत. पुण्यातील नारायणगाव येथील मोहन देशपांडे आणि सायली देशपांडे या दांपत्याला शोना इंगळे हिने मदत केली. हे दांपत्य आर्थिक अडचणीत होतं आणि त्यांनी मला १५ दिवसांसाठी १५ लाख रुपये हवेत असं सांगितलं. मी त्यांना १५ लाख रुपयांची मदत केली, हे पैसे तिने इतरांकडून गोळा करुन दिले होते. सोनं विकून आणि काही मैत्रिणीकडून गोळा करून तिने हे १५ लाख रुपये देशपांडे दांपत्याला मदत म्हणून दिले होते. पण आता हे दोघेही फरार असल्याचे कळताच शोनाने पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र गेले काही दिवस पोलीस देखील या प्रकरणात लक्ष देत नसल्याचा दावा करत शोनाने सोशल मीडियावर मदतीचे आवाहन केले आहे.
https://www.facebook.com/share/r/19LPhatxVF/
शोना इंगळे यांनी नेमक्या कोणत्या अडचणी साठी देशपांडे दांपत्याला मदत केली होती. तसेच हे दांपत्य तिच्या संपर्कात कसे आले, याबाबत कोणतीही माहिती व्हिडिओत दिली नाही, दरम्यान अनेकांनी शोना इंगळे हिला धीर दिला आहे. तसेच पोलीसांनी तपास करावा, असे आवाहन देखील केले आहे.