
मी तुझ्यावर प्रेम करतो तु फक्त माझी हो नाहीतर….
तरूणाच्या त्रासाला कंटाळून शिक्षिकेने उचलले टोकाचे पाऊल, नीलची तक्रारही केली पण....
अहमदाबाद – देशात आजही महिला असुरक्षित असल्याचे समोर आले आहे. रोडरोमिओ आणि गावगुंड आजही मुलींना त्रास देत असतात. त्यामुळे अनेक मुलींना शाळा किंवा नोकरी करता येत नाही, हे वास्तव आहे. अनेकदा टवाळ मुलांच्या त्रासाला कंटाळून मुली आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत.
सुरतमध्ये एका शिक्षिकेने एका तरुणाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. ही मुलगी एका शिकवणी केंद्रात शिक्षिका म्हणून काम करत होती. नील नावाचा तरुण तिला सतत त्रास देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. नेनू वावडिया असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. ती कटारगाममध्ये एका क्लासमध्ये शिकवत होती. नील देसाई तिला सतत त्रास देत होता. नील देसाई नावाचा मुलगा काही महिन्यांपासून तिचा पाठलाग करत होता. तो तिला त्याच्यासोबत संबंध ठेवण्यास सांगत होता. नील तिला रोज फोन करायचा. तो तिला फोन करून धमक्या देत होता. तसेच, क्लासला जातानाही त्रास देत होता. याबाबत नेनूच्या पालकांनी याबाबत देसाईच्या वडिलांना याबाबत सांगितल्यानंतर पण त्यांनी उलट त्यांनाच धमक्या दिल्या आणि शिवीगाळ केली असा आरोप नेनूच्या पालकांनी केला आहे. या घटनेनंतर पाटीदार समाजाने मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना पत्र लिहिले आहे. विजय आर. मंगुकिया यांनी मुख्यमंत्र्यांना या प्रकरणाची दखल घेण्याची विनंती केली आहे. सिंघनपूर पोलिस स्टेशनचे निरीक्षक यू. बी. गोहिल यांनी सांगितले की, “पीडितेला गेल्या पाच महिन्यांपासून नीलकडून त्रास दिला जात होता. तो तिच्यावर संबंध टिकवून ठेवण्यासाठी दबाव आणत होता. आम्ही त्या ट्यूशन क्लासच्या मालकाकडून माहिती घेत आहोत, त्यातून महत्वाची माहिती मिळू शकते असे सांगितले आहे.
महिलांवरिल अत्याचार, त्यांची छेडछाड याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मुली आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आला आहे.