मी तुझ्या बापाचा सहकारी होतो, तु चूप हो आणि खाली बस…
राज्यसभेत जोरदार राडा, व्हिडिओ तुफान व्हायरल, कोण आहेत ते खासदार, वाद कशाचा?
दिल्ली – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर सोमवारी संसदेत वादळी चर्चा झाली. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वादाची स्थिती निर्माण झाली होती. याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
मल्लिकार्जुन खर्गे यांचे भाषण सुरू असतानाच भाजपा खासदार नीरज शेखर यांनी मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरून खर्गे यांनी नीरज शेखर यांना खडसावले आहे. खर्गे राज्यसभेत बोलत अशतानाच, माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे पुत्र तथा भाजप खासदार नीरज शेखर यांच्याशी त्यांचा जोरदार वाद झाला. त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून नीरज शेखर यांनी अक्षेप घेतला. त्यामुळे मल्लिकार्जुन खर्गे हे चांगलेच भडकले. ते म्हणाले की, ”तुझ्या बापाचाही मी असाच सहकारी होतो. त्याला घेऊन फिरलो. चूप, चूप, तू गप्प बस”, असे मल्लिकार्जुन खर्गे शेखर यांना खाली बसण्यास सांगितले. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरत्या मूल्याच्या मुद्द्यावर काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे राज्यसभेत बोलत होते. यादरम्यान, भाजप नेते नीरज शेखर यांनी अडवून काहीतरी सांगितले. यामुळे मल्लिकार्जुन खर्गे खूप संतापले. त्याने त्याला दटावले आणि म्हणाला, “मीही तुझ्या वडिलांचा मित्र होतो, गप्प बस, गप्प बस, शांत बस… शांत बस.”असे दटावले. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. सध्या खर्गे यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
भाजपा नेते आणि राज्यसभा खासदार नीरज शेखर हे माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे पुत्र आहेत. त्यांनी २०१९ मध्ये भाजपात प्रवेश केला होता. तसेच पक्षाने त्यांना राज्यसभा खादार बनवले होते. तत्पूर्वी ते समाजवादी पक्षामध्ये होते. तसेच समाजवादी पक्षाकडून ते राज्यसभा आणि लोकसभेचे खासदार बनले होते.