Latest Marathi News
Ganesh J GIF

‘सगळ्यांना हाणलं नाय तर जयंत पाटील माझं नाव नाही’

गोपीचंद पडळकर यांना जयंत पाटील यांचा इशारा, भाजपला दिले चौकशी करण्याचे आव्हान, राज्यात पाटील पडळकर वाद पेटणार?

सांगली – जप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर सातत्याने केलेल्या अत्यंत खालच्या पातळीवरील टीकेला अखेर जयंत पाटील यांनी जाहीर उत्तर दिले आहे. पाटील यांनी इस्लामपूर येथे एका मुलाखतीच्या कार्यक्रमात पडळकरांना अप्रत्यक्ष पण कठोर इशारा दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना समजही दिली होती. मात्र, त्यानंतरही गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर जहरी भाषेत टीका सुरुच ठेवली होती. परंतु, या सगळ्याला जयंत पाटील यांनी एकदाही समोर येऊन प्रत्युत्तर दिले नव्हते. त्यामुळे जयंत पाटील नेमके काय करत आहेत, असा प्रश्न राजकीय वर्तुळाला पडला होता. या पार्श्वभूमीवर नुकत्याच इस्लामपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या मुलाखतीच्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांना अप्रत्यक्षपणे उत्तर दिले आहे. वेळ येईल तेव्हा आम्ही या सगळ्याचे उत्तर देऊ, तोपर्यंत वाट बघू. टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम तर होणारच. मी मागे एकदा म्हटलं होतं की, ‘आपलं नाव ऐकलं नाही असं याक बी गाव नाय आणि सगळ्यांना हाणलं नाय तर जयंत पाटील माझं नाव नाही.’ जयंत पाटील यांच्या या वक्तव्यावर उपस्थित समर्थकांनी एकच जल्लोष केला. गोपीचंद पडळकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समज दिली होती, असे मी समजतो. त्यामधून त्यांनी काय बोध घेतला मला माहिती नाही. माझ्याविरोधात सगळ्यांनी मिळून बऱ्याच गोष्टी केल्या. याची चौकशी करा, त्याची चौकशी करा, असे अनेकजण बोलले. मला काहीही अडचण नाही. फक्त बोलू नका, माझी चौकशी कराच, असे सांगत जयंत पाटील यांनी आव्हान दिले आहे. जयंत पाटील आक्रमक झाल्यामुळे पुढील काळात पडळकर विरुद्ध पाटील असा कलगीतुरा सांगली जिल्ह्यात रंगण्याची शक्यता आहे.

 

गेले काही दिवस भाजप आमदार पडळकर यांनी केलेल्या अश्‍लाघ्य टिकेनंतरही राज्यभर राजकीय धुरळा उडाला असताना जयंत पाटील यांनी मात्र मौन पाळले होते. आज या प्रकट मुलाखीच्या निमित्ताने आज प्रदीर्घ काळानंतर त्यांनी विविध विषयांवर जाहीर भाष्य केले. राज्य सरकारच्या विविध धोरणांवर शेलक्या शब्दांत टिका केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!