Latest Marathi News
Ganesh J GIF

माझ्यात एवढे वाईट गुण होते तर अठरा वर्ष का गप्प बसलात? आताच असं काय झालं आहे बोलायला? असे सवाल करत सुळेंनी अजित पवारांना जाब विचारला

बारामती लोकसभा मतदारसंघातुन पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी ताकद लावली आहे. प्रचारसभांचा धडाका लावत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टिकेचे वार करत १५ वर्षांत काय विकास झाला असे प्रश्न अजित पवार सभेतून विचारत आहेत. मात्र आपल्या भावाबद्दल कधीही न बोलणाऱ्या खासदार सुप्रिया सुळेंनी पुण्यातल्या सभेत मौन सोडलं. सध्या विरोधक कोणी लिहून दिलेलं भाषण वाचत आहे हे माहीत नाही. पण माझ्यात एवढे वाईट गुण होते तर अठरा वर्ष का गप्प बसलात? आताच असं काय झालं आहे बोलायला? असे सवाल करत सुळेंनी अजित पवारांना जाब विचारला आहे.

सुप्रिया सुळेंसाठी उद्धव ठाकरे यांनी पुण्यात सभा घेतली. ही सभा पुण्यातल्या वारजे येथे पार पडली. सभेला काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, उमेदवार सुप्रिया सुळे, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना शहर प्रमुख गाजानंद ठरकुडे, आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की आपण कधीच आपल्या भावाबद्दल बोलणार नाही, टीका करणार नाही. परंतु अजित पवार सातत्याने करत असलेल्या टीकेमुळे पुण्यात झालेल्या सभेमध्ये सुप्रिया सुळे यांना थेट अजित पवारांना जाब विचारला आहे. आपल्या भागात विकास झाला. रस्ते असतील, पाणी असेल. पण काही लोक आज म्हणतात काहीच विकास झाला नाही. पण मी त्यांना माझं मराठीतील पुस्तक पाठवलं. त्यांनी आज रात्री वेळ काढून ते वाचावं. ते वाचल्यानंतर ते तुतारी वाजवणाऱ्या माणसालाच मतदान करतील अशी माझी खात्री आहे. पण त्यांना भाषण कोण लिहून देतंय असा प्रश्न मला पडायला लागला आहे, असा खोचक टोला सुळेंनी लगावला.

आपण अठरा वर्ष एका संघटनेत काम केलं, घटस्फोट होऊन सहा महिने झाले. पण माझ्यातले असे, असे गुण लोक सांगतात, जे मी कधी ऐकले पण नाहीत. पण माझा त्यांना प्रश्न आहे माझ्यात इतके अवगुण होते तर तुम्ही साडेसतरा वर्ष गप्प का बसलात? आताच तुम्हाला काय झालंय? आता असं काय झालंय की तुम्हाला हे सगळं दिसायला लागलं आहे. त्यामुळे दुर्दैव आहे. आमच्या विरोधकांकडे काही विषय नाही, अशा शब्दांत सुळेंनी विरोधकांना सुनावलं.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!