Latest Marathi News
Ganesh J GIF

माझ्या पतीची हत्या त्याच्या वडिलांनी नाही तर…

सासऱ्यांना शर्टाचे बटनही लावता येत नव्हते म्हणत पायल पाटील यांचा मोठा दावा, या व्यक्तीवर आरोप

जळगाव – जळगाव जिल्ह्यामधील प्रसिद्ध रीलस्टार विकी पाटीलची हत्या करुन त्याच्या वडिलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. माजी सैनिक असलेल्या पित्याने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट मध्ये आपल्या मुलाची आपण हत्या केल्याचे केले स्पष्ट केले होते. या प्रकरणात आता ट्विस्ट आलाय.

जळगाव जिल्ह्यात रील स्टार असलेल्या मुलाची हत्या करत माजी सैनिक असलेल्या पित्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. माजी सैनिक असलेल्या पित्याने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोटमध्ये आपल्या मुलाची आपण हत्या केल्याची कबुली दिली होती. पण आता या प्रकरणात पत्नी पायल पाटीलने मोठा दावा केला आहे. माझ्या पतीची हत्या त्याच्या वडिलांनी केली नसून दोघा बापलेकांना काकाने संपवल्याचा धक्कादायक दावा तिने केला आहे. सासऱ्यांना शर्टाचे बटनही लावता येत नाही, ते खून कसा करतील, असा सवाल पायल पाटील यांनी उपस्थित केला आहे. विकीच्या आईने मात्र तिच्या पतीनेच विकीची हत्या करून नंतर आपलं जीवन संपवल्याचा दावा केला आहे. विकी हा मद्यपान करायचा, आपल्याचा जुमानायचा नाही, तसेच मारहाणही करायचा, त्यामुळे वैतागलेल्या वडिलांनी त्याची हत्या केली, असे विकीच्या आईने म्हटले आहे. विकी पाटीलचे वडील विठ्ठल सखाराम पाटील हे माजी सैनिक होते. त्यांनी मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये “माझ्या मुलाचा खून केला असून, त्याचा मृतदेह धरणात पुरण्यात आला आहे,” असे लिहिले होते. त्यामुळे या घटनेला वेगळं वळण लागण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विक्की पाटील यांला त्याच्या वडिलांनी नाही मारलंय. अशा खोट्या बातम्या पसरवू नका. विक्की पाटील आणि त्याच्या वडिलांची हत्या विक्कीच्या काकांनी केली असल्याची एका चाहत्यानं आपल्या इन्स्ट्राग्रामला स्टोरी ठेवलेली आहे. त्यामुळे नवीन चर्चा होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!