Latest Marathi News
Ganesh J GIF

तर दोन हजारच काय पाच आणि दहा हजारांचीही नोट आली असती

या कारणामुळे सरकारने नाकारला प्रस्ताव, अगोदर वापरली जायची 'एवढ्या' चलनाची नोट

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २००० ची नोट चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतल्यापासून त्यावर जोरदार चर्चा होत आहे. क्लीन नोट पॉलिसीनुसार ही नोट मागे घेण्यात आली आहे. मात्र आता एक नवीनच माहिती समोर आली आहे. त्यामुळे अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दो हजार पेक्षाही जास्त मूल्याच्या नोटा छापण्याचा प्रस्ताव सादर केला होता.

मनमोहन सिंग सरकारमध्ये रघुराम राजन यांना आरबीआयचे गव्हर्नर बनवण्यात आले होते. २०१३ ते २०१६ पर्यंत ते या पदावर होते.पण आता संसदेच्या सार्वजनिक लेखा समितीला भारतीय रिझर्व्ह बँकेने माहिती दिली की, रघुराम राजन गव्हर्नर असताना ऑक्टोबर २०१४ मध्ये ५,००० आणि १०,००० रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यावेळच्या १,००० रुपयांच्या सर्वात मोठ्या नोटेच्या चलनवाढीमुळे त्याचे मूल्य कमी झाल्याचे कारण होते. तेव्हा देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली होते. ५००० आणि १०००० रुपयांच्या नोटा छापण्याचा प्रस्ताव सरकारने न स्वीकारण्याचे ठरवले. त्याऐवजी, १८ महिन्यांनंतर, मे २०१६ मध्ये, सरकारने रिझर्व्ह बॅकेला कळवले की ते २००० रुपयांच्या नवीन नोटांची मालिका सुरू करण्याच्या “तत्त्वतः अनुकूल” आहे. त्याचवेळी जून २०१६ मध्ये २००० रुपयांच्या नव्या नोटा छापण्याचे आदेश देण्यात आले होते. सरकारच्या निर्णयाबाबत बोलताना रघुराम राजन म्हणाले होते की, बनावट नोटेच्या भीतीमुळे जास्त मूल्य असलेल्या नोटा चलनात ठेवणे कठीण आहे. सप्टेंबर २०१५ मध्ये राजन यांनी चिंता व्यक्त केली होती की, जर आपण खूप मोठ्या नोटा छापल्या तर बनावट नोटा मोठ्या प्रमाणावर तयार होतील. असा त्यांचा अंदाज होता.

स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतर एक काळ असा होता, जेव्हा देशातील सर्वात मोठी नोट ₹ १०,००० ची होती. या चलनाची पहिली नोट १९३८ मध्ये देशात आली होती, जी १९४६ पर्यंत चलनात होती. यानंतर ते १९५४ मध्ये पुन्हा सुरू करण्यात आले आणि १९७८ मध्ये ती बंद करण्यात आली.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!