Latest Marathi News
Ganesh J GIF

‘हा अभिनेता बोलला असता तर मुंबईत दहशतवादी हल्ला झाला नसता’

मुंबई दहशतवादी हल्ल्याबाबत उज्ज्वल निकम यांचा मोठा गाैप्यस्फोट, अबू सालेमचे नाव घेत केला मोठा दावा

मुंबई – वरिष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात बॉलिवूड अभिनेता संजय दत्तवर एक गंभीर आणि धक्कादायक दावा केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वाद रंगण्याची चिन्हे आहेत.

संजय दत्तने योग्य वेळी पोलिसांना माहिती दिली असती, तर मुंबईतील भीषण बॉम्बस्फोट टाळता आले असते आणि २६७ निरपराध नागरिकांचे प्राण वाचले असते, असा दावा उज्ज्वल निकम यांनी केला आहे, ते म्हणाले, बॉम्बस्फोटाच्या आदल्या दिवशी दहशतवादी अबू सलेमने शस्त्रांनी भरलेली व्हॅन संजय दत्तच्या घरी आणली होती. संजय दत्तने त्या व्हॅनमधून काही हँड ग्रेनेड आणि बंदुका घेतल्या होत्या, परंतु शेवटी त्याने फक्त एके-47 रायफल स्वतःकडे ठेवली आणि उर्वरित शस्त्रे परत केली. तरीही, त्याने पोलिसांना या व्हॅनबद्दल वा दहशतवादी संपर्काबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. उज्ज्वल निकम यांच्या मते, जर तो वेळेत पोलिसांकडे गेला असता, तर तपास सुरू झाला असता आणि १२ मार्च १९९३ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ला थांबवता आला असता. संजय दत्तला टाडा अंतर्गत बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. पण नंतर त्याला फक्त शस्त्र कायद्यांतर्गत दोषी ठरवण्यात आले आणि पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. अभिनेत्याने ही शिक्षा पुण्यातील येरवडा तुरुंगात पूर्ण केली. त्याला २०१६ मध्ये सोडण्यात आले. निकम यांनी असाही दावा केला की, संजय दत्त निर्दोष आहे. त्याने बंदूक फक्त त्याला शस्त्रांचा शौक असल्यामुळे ठेवली होती. जरी कायद्याच्या दृष्टीने त्याने गुन्हा केला असला, तरी खरेतर तो एक साधा-सरळ माणूस आहे. संजयकडे एके-47 होती, पण त्याने कधीही त्याचा वापर केला नाही.

निकम हे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ते मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढले होते पण काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याकडून ते पराभूत झाले. आता ते राज्यसभा खासदार झाले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!