
ठाणे दि १६ (प्रतिनिधी)- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार प्रकाश सुर्वे यांच्या चिथावणीखोर भाषणामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी आपल्या भाषणातून शिवसेनेला उद्देशून मारहाणीची भाषा केली आहे.शिवसेनेने या वक्तव्यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
आमदार प्रकाश सुर्वे यांनी दहिसर कोकणीपाडा बुद्धव विहार येथील कार्यक्रमात चिथावणीखोर भाषण केले होते. “यांना यांची जागा दाखवल्याशिवाय आपण गप्प बसायचे नाही.कोणतीही दादागिरी खपवून घ्यायची नाही.प्रकाश सुर्वे इथे बसलाय कोणी आरे केले त्याला कारे करा. हात तोडता नाही आला तर तंगडी तोडा दुसऱ्या दिवशी जामीन करून देतो” असे चिथावणीखोर विधान सुर्वे यांनी केले आहे.सुर्वे मागठाणेचे आमदार आहेत त्यांनी एकनाथ शिंदेना साथ देत बंडखोरी केली होती. सुर्वे यांच्या या विधानावर शिवसेनेने आक्षेप घेत पोलिसत तक्रार दाखल केली आहे शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी सुर्वे यांचा व्हिडिओ ट्विट करत कारवाईची मागणी केली आहे.
या व्हिडिओमध्ये बोलणारी व्यक्ती आम. प्रकाश सुर्वे जाहीरपणे हातपाय तोडण्याची, कापून काढण्याची कोथळा बाहेर काढण्याची भाषा करत आहेत.
गृहमंत्रालय स्थापित झाले असेल तर अशा गावगुंडांचे सदस्यत्व अजुन का अबाधित आहे हे सांगावे. @Dev_Fadnavis @mieknathshinde @SaamanaOnline @OfficeofUT pic.twitter.com/YDIbLYXtAo— Andhare Sushama (@andharesushama) August 15, 2022
सुर्वे यांनी बंडखोरी केल्यानंतर विधानभवनात आदित्य ठाकरे आणि प्रकाश सुर्वे यांची भेट झाली होती. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी विचारलेल्या प्रश्नावर सुर्वे खजिल झाल्याचे पहायला मिळाले होते. पण आता मात्र त्यांनी आक्रमक हो इशारा दिला आहे.