Latest Marathi News
Ganesh J GIF

विधान परिषद सभापतीपद भाजप राष्ट्रवादीकडून खेचणार

फडणवीसांच्या विश्वासातील 'हा' नेता सभापती होणार

मुंबई दि १६ (प्रतिनिधी)- राज्यात सत्तांतर घडवल्यानंर शिंदे-फडणवीस सरकार आता विधान परिषदेत सत्तांतर घडवण्याच्या तयारीत आहे. विधानपरिषदेचे सभापतीपद मिळवण्यासाठीच्या हालचाली भाजपाने सुरु केल्या आहेत.विधान परिषदेच्या सभापतीसाठी भाजपकडून प्राध्यापक राम शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.

सद्यस्थितीत विधानपरिषदेत भाजपकडे २४, शिवसेनेकडे ११ तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे प्रत्येकी १० जागा आहेत. तसेच १६ जागा रिक्त आहेत. यामध्ये राज्यपाल नियुक्त १२ जागांचाही समावेश आहे. विधान परिषदेचा सभापती निवडण्यापूर्वी या जागांची नियुक्ती झाल्यास भाजपचे संख्याबळ महाविकास आघाडी पेक्षा जास्त होणार आहे. त्यामुळे भाजपाला विधान परिषदेतही बहुमत सिद्ध करता येणार आहे.या पदासाठी राम शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. रोहित पवार यांना रोखण्यासाठी तसेच बारामती लोकसभेत निरिक्षक म्हणून काम करण्यासाठी बळ मिळावे यामुळे त्यांचे नाव आघाडीवर आहे.

सध्या विधानपरिषदेचे सभापतीपद रामराजे निंबाळकर यांच्याकडे आहे. महाविकास आघाडीचे संख्याबळ भाजपापेक्षा अधिक आहे. पण विरोधी पक्षनेतेपदाच्या वेळेस विश्वासात न घेतल्याने काँग्रेस नाराज आहे. आणि भाजपाने नाराजांच्या साथीने राज्यसभा, विधानपरिषद निवडणुकीचे मैदान मारले होते. त्यामुळे सभापती निवडीत काय होणार हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!