
‘तुला मराठी येत नाही तर तुला पैसे मिळणार नाहीत’
मुंबई जोडप्याकडून डिलिव्हरी बाॅयला भाषेमुळे पैसे देण्यास नकार, व्हिडिओ व्हायरल, प्रकरण काय?
मुंबई – मराठी बोलता येत नसल्यामुळे वाद झाल्याच्या अनेक घटना राज्यभरातून समोर आल्या आहेत. आता या घटनांमध्ये आणखी एका घटनेची भर पडली आहे. पण या ठिकाणी मराठी येत नसल्यामुळे पेमेंट न केल्याचा प्रकार समोर आला आहे.
मुंबईतील भांडुप परिसरात राहणाऱ्या एका जोडप्याने डाॅमिनोजमधून आॅनलाईन पिझ्झा मागवला होता. डिलिव्हरी बाॅय पिझ्झा घेऊन आल्यानंतर त्याला मराठी येत नसल्यामुळे पिझ्झाचे पैसे देण्यास नकार दिला आहे. भांडुप परिसरातील साई राधा नावाच्या इमारतीत राहणाऱ्या एका जोडप्याने डोमिनोजमधून पिझ्झा ऑर्डर केला. रोहित लावरे नावाचा एक तरुण हा ऑर्डर देण्यासाठी आला. त्यावेळी जोडप्याने बाॅयला मराठी बोलण्यास सांगितले. त्याला नीट मराठी बोलता येत नसल्यामुळे चक्क पिझ्झाचे पैसे देण्यास नकार दिला. डिलिव्हरी बॉयने ही संपूर्ण घटना त्याच्या मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली. व्हिडिओमध्ये तो म्हणताना दिसतोय की, मराठी बोलण्याची सक्ती केली का केली जातेय? यावर घरात उभी असलेली बाई म्हणते, इथे असेच आहे. यावर डिलिव्हरी बॉयने म्हटलं की, जर तुम्हाला हिंदी येत नसेल तर तुम्ही ऑर्डर करायला नको होते. यावर घरातील व्यक्ती म्हणते. जर तुम्हाला मराठी येत नसेल तर पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे रोहितला पैसे न घेताच परतावे लागले. सध्या हा व्हिडिओ व्हायरल झाला असून यावर समिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
या घटनेनंतर डोमिनोजकडून अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मुंबई पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे याबाबत कोणतीही ठोस माहिती आलेली नाही.