Latest Marathi News
Ganesh J GIF

जळगाव जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का 400 कार्यकर्त्यांनी व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश

लोकसभा निवडणुकीसाठी सध्या काहीच दिवस शिल्लक राहीले आहेत. असे असताना आता ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. हा धक्का ठाकरे गटाला जळगावमध्ये बसलाय. कारण जळगावमधील तब्ब्ल पदाधिकाऱ्यांसह 400 कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत रविवारी रात्री हा पक्षप्रवेश पार पडला.

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर व चोपडा परिसरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील तसेच शरद पवार गटातील जवळपास 400 कार्यकर्त्यांनी व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्र्यांसह मंत्री गुलाबराव पाटील , बुलढण्याचे खासदार प्रतापराव जाधव व माजी आमदार चिमणराव पाटील उपस्थित होते. पक्षप्रवेशामुळे मात्र जळगाव जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का पोहोचला आहे.

पक्षप्रवेशानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही निवडणुकीत गुंतलो असलो तरी मी दररोज सकाळी माहिती घेतो. त्याप्रमाणे मी मुख्य सचिव , विभागीय आयुक्त , जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेतो . त्यांना सूचना देतो की, तात्काळ पंचनामे करा हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जागरूक आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांना नुकसान भरपाई मिळेल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपा जाहीरनाम्यावर म्हणाले, भाजपचा जाहीरनामा हाच महायुतीचा जाहीरनामा आहे. त्याच मी स्वागत करतो. गेल्या दहा वर्षात मोदींनी जे केलं या जाहीरनामा सर्वसामान्यांचं जीवन बदलणारा जाहीरनामा आहे . त्याच मी स्वागत करतो आणि मोदींना धन्यवाद देतो.

काही दिवसापूर्वी भाजपचे जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील, नगराध्यक्ष करण पवार आणि त्याचे अनेक सहकारी, पदाधिकारी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर पक्षप्रवेश केला. उन्मेष पाटलांच्या ठाकरे गटात प्रवेशामुळे जळगावची निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे. भाजपने जळगाव मतदारसंघातून विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचं तिकीट कापलं. जळगाव मतदारसंघातून भाजपने ऐनवेळी उन्मेष पाटलांचा पत्ता कापत स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर उन्मेष पाटील नाराज असल्याचं समोर आलं होतं.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!