Latest Marathi News
Ganesh J GIF

लोणी काळभोरमध्ये मुलाला बळजबरीने किन्नर बनवण्याचा प्रयत्न

अल्पवयीन मुलाच्या पालकांची पोलिसांकडे धाव,पोलीसांकडून मुलाचा शोध सुरू पालकांचे गंभीर आरोप

पुणे दि ११(प्रतिनिधी)- लोणी काळभोर परिसरातील एका अल्पवयीन मुलाला बळजबरीने किन्नर बनवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. कदमवाक वस्तीतील एका किन्नर टोळीवर अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी हा आरोप करत लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुदार तक्रार करणाऱ्या व्यक्तीचा लहान मुलगा २५ मे ते ५ जुन या काळात घरातून निघून गेला होता. त्यामुळे त्यांनी पालकांकडे आणि ओळखीच्या लोकांकडे चाैकशी करत तपास सुरु केला होता. त्यावेळी किन्नर टोळीने त्याला परत घरी सोडून दिले. पण त्या मुलाच्या वागण्यात बोलण्यातला फरक पालकांच्या लक्षात आला. या दहा दिवसाच्या काळात त्याला बळजबरीने मतपरिवर्तन करून किन्नर बनवण्याचा प्रयत्न केला जात होता. संबंधित कुटुंब वारकरी संप्रदायातील आहे. त्यांचा लहान मुलगा हा देखील मंदिरामध्ये भजनासाठी जात होता. यावेळी काही किन्नारांनी त्याला बळजबरीने किन्नर बनवण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्याचे अपहरण करण्यात आले होते. दरम्यान सोशल मिडीयावर त्या मुलाचे किन्नारांसोबत नाचतानाचे व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत. यावेळी पालकांनी संबंधित टोळीतील काही किन्नर बोगस असल्याचा आरोप केला आहे. अल्पवयीन मुलगा परत एकदा गायब झाला असुन पालकांनी पोलीसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली आहे.

पोलीस अल्पवयीन मुलाचा शोध घेत असून, सर्व बाजूंनी तपास केला जाईल असे वरिष्ठ पोलीस निरिक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी सांगितले आहे. तर तक्रा मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप गायब असलेल्या मुलाच्या पालकांनी केला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!