पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दोन मुलं आपल्या आईसोबत लिफ्टच्या सहाय्याने इमारतीच्या वरच्या मजल्यावर जात होते. लिफ्टमधून बाहेर पडल्यावर अवघ्या काही सेकंदात लिफ्ट कोसळून मोठी दुर्घटना घडली.
ही संपूर्ण दुर्घटना त्या ठिकाणी असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सध्या सोशल मीडियावर या अपघाताचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
काय घडले नेमके?
पुण्यातील बावधन परिसरामध्ये ही दुर्घटना घडली आहे. घटना घडली तेव्हा लिफ्टमध्ये दोन मुलं आणि त्यांची आई होती. तळमजल्यावरुन दहाव्या मजल्यावर लिफ्ट पोहोचली. त्यानंतर दोन्ही मुलं आईसोबत लिफ्टमधून बाहेर पडली. मुलं बाहेर पडताच दहा सेंकदात ही लिफ्ट धाडकन खाली कोसळली
महिलेला मुलांसोबत 7व्या मजल्यावर जायचं होतं. पण ही लिफ्ट 7व्या मजल्यावर थांबलीच नाहीत. मुलानं 7व्या मजल्याचं बटण दाबल पण तरीही लिफ्ट थेट 10व्या मजल्यावर जाऊन थांबली. लिफ्ट थांबताच मुलगा आणि महिला बाहेर आले. त्यानंतर लिफ्टचा दरवाजा बंद झाला. पण काही क्षणातच 10 व्या मजल्यावर थांबलेली लिफ्ट खाली कोसळली. महिला आणइ मुलं अजून काही वेळ लिफ्टमध्ये थांबले असते तर ते देखील लिफ्टसोबत कोसळले असते. त्यांना गंभीर इजा होण्याची शक्यता होती.