राजधानी दिल्लीत प्रेयसीवर चाकूने ४० वार करत निर्घुण हत्या
हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद, आरोपी साहिलला पोलीसांनी ठोकल्या बेड्या, कठोर कारवाईची मागणी
दिल्ली दि २९(प्रतिनिधी)- देशाची राजधानी दिल्लीत प्रियकराने आपल्यास प्रेयसीचा चाकूने भोसकून खून केला आहे. राजधानी दिल्लीतील गर्दीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून हत्येचे कारण अस्पष्ट आहे.
रविवारी संध्याकाळी दिल्लीच्या शाहबाद डेअरी परिसरात साक्षीची हत्या करण्यात आली. आरोपी साहिलचे एका १६ वर्षीय साक्षीसोबत प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वीच दोघांमध्ये अज्ञात कारणावरुन वाद झाला होता. या वादानंतर साक्षी रविवारी संध्याकाळी आपल्या मैत्रिणीच्या मुलाच्या वाढदिवसाला जाण्यासाठी घराबाहेर पडली. त्यावेळी साहिलने तिला रस्त्यामध्ये अडवले. दोघांमध्ये सुरुवातीला बाचाबाची झाली. त्यानंतर साहिलने सोबत आणलेल्या चाकूने साक्षीवर सपासप वार केले. साहिलने साक्षीवर तब्बल ४० वार केले. साहिल ऐवढ्यावर थांबला नाही तर त्याने साक्षीच्या डोक्यावर सहा वेळा दगडाने वार केले. विशेष म्हणजे ही साहिल मुलीवर वार करीत असताना लोकं येत जात होती पण कोणीही मध्यस्थी करुन त्याला अडवले नाही. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार साक्षी आणि आरोपी साहिल दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. मात्र शनिवारी दोघांमध्ये काही कारणावरून भांडण झाले. याचाच राग मनात ठेवून ही हत्या करण्यात आली. साक्षीच्या हत्येनंतर आरोपी साहिलने घटनास्थळावरुन पळ काढला. शाहबाद पोलिसांनी आरोपी साहिलविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. अवघ्या काही तासांत पोलिसांनी साहिलच्या मुसक्या आवळल्या आहेत. बुलंदशहरातून त्याला अटक केली. दरम्यान हत्येची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेमुळे दिल्ली हादरली आहे.
दिल्ली के शाहबाद डेरी इलाके में 16 साल की साक्षी की चाकुओं से गोदकर हत्या
20 से ज़्यादा बार चाकुओं से गोदा
इतनी बेरहमी से कौन मारता है, दरिंदगी की सारी हदें पार कर दीं #DelhiMurder#SakshiMurder pic.twitter.com/QwVmnTbvGi— Shehla J (@Shehl) May 29, 2023
राष्ट्रीय महिला आयोगाने या रानटी हत्याकांडाचा निषेध केला आहे. एनसीडब्ल्यूच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनीही यासंदर्भात दिल्लीच्या डीसीपींना पत्र लिहिले आहे. भाजप नेते कपिल मिश्रा यांनीही साहिल सरफराजच्या हातातील दोरा पाहून हा लव्ह जिहाद असल्याचे म्हटले आहे. सोशल मिडीयावर साहिलवर संताप व्यक्त केला जात आहे.