या राज्यात भाजपाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरला
मुख्यमंत्रीपदासाठी राजकुमारीला संधी, या माजी मुख्यमंत्र्यांचा पत्ता कट, पहा कोण आहेत या राजकुमारी
भोपाळ दि १४(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणूकीची सेमीफायनल म्हणून ओळखली जाणारी पाच राज्यांची निवडणुक जाहीर झाली आहे. पण यावेळी भाजपाने सात खासदारांना विधानसभेचे तिकिट दिले आहे. यात खासदार दिया कुमारी यांचा समावेश आहे. त्यामुळे राजस्थानमधील या निवडणुकीत दिया कुमारी या भाजपाच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार असतील अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे दिया कुमारी चर्चेत आल्या आहेत. विशेष म्हणजे दिया कुमारी देखील राजघराण्यातून आलेल्या आहेत.
राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबर २०२३ रोजी जाहीर केला जाणार आहे. राजस्थानमध्ये पुन्हा एकदा आपली सत्ता आणण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. काँग्रेसने आपली उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. पण भाजपाने मात्र यादी जाहीर करत प्रचारात आघाडी घेतली आहे. या अगोदर राजस्थानमध्ये वसुंधरा राजे भाजपाच्या चेहरा होत्या. पण मोदी काळ सुरु झाल्यापासून राजेंना भाजपातून साईडलाईन करण्यात येत आहे. त्यातच अमित शहा आणि वसुंधरा राजे यांच्यात वितुष्ट आलेले आहे. त्यामुळे भाजपाकडुन यंदा वसुंधराराजे एैवजी दिया कुमारी यांना प्रमोट केले जाणार आहे. राजस्थानमध्ये राजपूत १४ टक्के आहेत आणि ६० विधानसभा मतदारसंघांवर त्यांचा प्रभाव आहे. त्यामुळे वसुंधरा राजेंच्या जागी दिया कुमारी यांना पुढे केल्यास राजपुत समाज भाजपाकडेच राहणार आहे. त्यामुळे वसुंधरा राजे नाराज झाल्या, तरी पक्षाचे कोणतेही नुकसान होणार नाही, याची खात्री भाजपला आहे. महाराणी दिया या मेवाडमधील राजसमंदच्या खासदार आहेत. विशेष म्हणजे दिया कुमारी खासदार देखील राहिलेल्या आहेत. त्यातच त्यांचे २०१८ साली वसुंधरा राजेंबरोबर संघर्ष झाल्याने त्यांचे तिकिट कापण्यात आले होते. पण पक्षाने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती. त्या निवडून येत खासदार देखील झाल्या. या काळात त्यांचे मोदी आणि शहांसोबत सलोख्याचे संबंध झाल्याने भाजपाची सत्ता राजस्थानमध्ये आल्यास दिया कुमारी याच मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची शक्यता जास्त आहे. महाराणी दिया कुमारी यांच्यावर भ्रष्टाचाराचे कोणतेही आरोप नाहीत आणि एकूणच त्यांची प्रतिमाही स्वच्छ आहे. याचा फायदा भाजपाला होण्याची शक्यता आहे.
राजकुमारी दिया कुमारी यांनी आपण रामाचे वंशज असल्याचा दावा केला होता. रामाचे पुत्र कुश यांचे आपण वंशज असुन आपल्याकडे त्याचे पुरावे आहेत. असा दावा त्यांनी केला होता. त्याचबरोबर आपल्याकडे ताजमहाल आमचा असल्याचे पुरावे आहेत. असा देखील दावा त्यांनी केला होता. यासाठी न्यायालयाचे दरवाजे देखील त्यांनी ठोठावले होते. त्यामुळे यंदा दिया कुमारी भाजपाला परत सत्ता मिळवून देणार का? हे पहावे लागेल.