Latest Marathi News
Ganesh J GIF

मुंबई लोकलमध्ये महिलाचा या लावणीवर धमालेदार डान्स

महिलेच्या लावणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल, नेटकरी लावणीवर फिदा, एकदा बघाच

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- मुंबई आणि लोकलचे अनोखे नाते आहे. या लोकलमध्ये अनेक चांगल्या गोड आठवणी सामावलेल्या आहेत. म्हणून लोकलला मुंबईची लाईफलाईन म्हटले जाते. लोकल हा मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा मुख्य भाग आहे. दररोज हजारोच्या संख्येने लोकं लोकलने प्रवास करत असतात. सध्या या लोकलमधील एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

मुंबई लोकलमधील अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यात काही मारामारीचे तर काही गाण्याचे व्हिडीओ आहेत. पण आता मुंबई लोकलमध्ये एक वेगळाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात एका महिलेने लोकलमध्ये मागणीच्या तालावर डान्स केला आहे. हा व्हिडिओ आता तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक महिला नऊवारी नेसत लावलीवर थिरकली आहे. या व्हिडीओत दिसत आहे की, एका महिला नऊवारी साडी नेसली आहे. त्यासोबत साज शृंगार करून ती महिला नटरंग उभा’ या गाण्यावर डान्स करत आहे. विशेष म्हणजे या महिलेने गाण्यातील सर्व स्टेप सेम टू सेम केल्या आहेत. विशेष म्हणजे लोकलमध्ये हा डान्स केल्याने तिचे काैतुक होत आहे. कारण सार्वजनिक ठिकाणी डान्स होत असल्यामुळे त्या महिलेचे धाडस पाहून अनेकांनी तिचे काैतुक केले आहे. rupamore77 या इन्स्टग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात सर्वाधिक प्रतिक्रिया काैतुकाच्या आहेत. हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. दरम्यान लोकलमध्ये प्रवाशांच्या मारामारीचे व्हिडिओ जास्त व्हायरल होत असतात. त्यात अलीकडे महिला मारीमारीचे व्हिडीओ जास्त व्हायरल होत आहेत.

View this post on Instagram

A post shared by @rupamore77

यापूर्वीही लोकलमध्ये मंगळागौर खेळतानाचा काही महिलांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. मुंबईच्या लोकलमध्ये अनेक तरुण, मुली आणि महिला वेगवेगळ्या पद्धतीने व्हिडिओ, रिल्स तयार करत असतात. पण यात काहीजण जीव धोक्यात घालून देखील व्हिडिओ करत असतात.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!