दुसऱ्या कसोटी विजयानंतर भारताचा अनोखा विश्वविक्रम
भारताने तिस-या दिवशी दिल्ली जिंकली, बघा टीम इंडीयाने कोणता विक्रम केला
दिल्ली दि १९(प्रतिनिधी)- भारत आणि ऑस्ट्रेलियामधील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील दुसरा कसोटी सामन्यात देखील भारताने आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. अवघ्या तीन दिवसात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारताने कसोटी मालिकेत २-० ची आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर अनोखा विक्रम देखील भारतीय क्रिकेट संघाने केला आहे.
भारताने दिल्लीचा गड जिंकताच अनोखा विक्रम केला आहे. दुस-या कसोटी विजयासह भारताने आयसीसीच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. सध्याच्या घडीला भारताचे १२१ गुण झाले असून ऑस्ट्रेलियाचे १२० गुण आहेत. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातील विजयासह भारताने आयसीसीच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. काही दिवसापूर्वी भारतीय संघाला आयसीसी क्रमवारीत तिन्ही फाॅरमॅटमध्ये एक नंबर दाखवण्यात आले होते. पण नंतर टी चूक असल्याचे आयसीसीने मान्य करत भारताची माफी मागितली होती. पण आता दुसरा सामना मोठ्या फरकासह जिंकल्यामुळे क्रमावारीत बदल झाला आहे. दुसऱ्या विजयानंतर भारतीय संघाला एक गुण मिळाला आहे, दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे दोन गुण कमी करण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ हा बराच काळापासून अव्वल स्थानावर होता, पण आता भारताने पहिले स्थान पटकावले आहे.
दिल्ली कसोटीमध्ये नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २६३ धावा केल्या होत्या, तर भारताने पहिल्या डावात २६२ धावा केल्या होत्या. पर भारताने आॅस्ट्रेलियाचा दुसरा डाव अवघ्या ११३ धावात आटोपला होता. भारताने हे लक्ष्य अवघ्या चार गड्यांच्या मोबदल्यात हे लक्ष्य गाठत कसोटी मालिकेत दुसरा विजय मिळवला.