Latest Marathi News
Ganesh J GIF

बारामतीत अजित पवारांच्या बॅगेची तपासणीहेलिकॉप्टरमधील बॅगेत आढळल्या ‘या’ वस्तू, बॅगेतील वस्तूने सारेच थक्क, पाहा व्हिडिओ

 माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बॅगेची सोमवारी आणि मंगळवारी तपासणी झाल्याचा मुद्दा ताजा असतानाच आता उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरचीही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली आहे. यासंदर्भातील माहिती स्वत: अजित पवार यांनी दिली आहे. अजित पवारांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधील बॅगेत सापडलेल्या गोष्टींने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बँगांचीही ५ नोव्हेंबर रोजी तपासणी झाल्याचे व्हिडीओ भाजपाने पोस्ट केले असतानाच आता अजित पवारांच्या बँगांचीही तपासणी झाल्याचं समोर आलं आहे.

अजित पवारांनी आपल्या अधिकृत एक्स हॅण्डलवरुन निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टर आणि त्यामधील बँगांची तपासणी केल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ हेलिकॉप्टरमधून शूट करण्यात आला आहे. हेलिकॉप्टरबाहेर उभे असलेले अधिकारी सीटवर ठेवलेली अजित पवारांची बॅग तपासताना दिसत आहेत. अधिकारी बॅगमधील सामान तपासत असताना अजित पवार समोरच्या सीटवर बसले असून मोबाईलवर बोलताना दिसत आहेत. एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हाताने बॅग उघडून देत कर्मचाऱ्यांना बॅगमध्ये काय आहे हे दाखवत असल्याचं दिसत आहे. अजित पवारांनी आपल्याकडील लॅपटॉप बॅगही अधिकाऱ्यांना तपासण्यासाठी दिली. तसेच त्यानंतर त्यांनी थंड पाण्याच्या बाटल्या ठेवण्यासाठीचा बॉक्सही अधिकाऱ्यांना उघडून दाखवला. या व्हिडीओमध्ये जॅकेट कव्हरमध्ये असलेलं अजित पवारांचं जॅकेटही सीटवर दिसत आहे. यावेळी एका बॅगेत चकल्या होत्या. बॅगेत चकल्या हातात घेऊन खा-खा बाबा…सगळ्या बॅगा तपास. हा डबा तपास, त्या डब्यात पैसे आहेत का चेक कर…असं अजित पवार अधिकाऱ्यांना बोलताना ऐकू येत आहे. अजित पवारांच्या बॅगमधून चकलीचं पाकिटाबरोबरच खाद्य पदार्थांची काही पाकिटं, डबा आणि इतर गोष्टी अधिकाऱ्यांनी बाहेर काढल्याचं दिसत आहे. अजित पवारांनी डबा उघडून तपासण्यास सांगितला असता अधिकाऱ्यांना या डब्यामध्ये लाडू असल्याचं दिसलं.

 

हा व्हिडीओ शेअर करताना अजित पवारांनी, “मी आज निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असताना निवडणूक आयोगाने माझ्या हेलिकॉप्टरची आणि हेलिकॉप्टरमधील बँगांची तपासणी केली. मी यावेळी त्यांनी पूर्ण सहकार्य केलं. मुक्त आणि पारदर्शक निवडणुकीसाठी अशाप्रकारच्या अत्यावश्यक गोष्टी गरजेच्या असल्याचं माझं मत आहे. आपण सर्वांनी कायद्याचा आदर केला पाहिजे. या माध्यमातून आपण आपल्या लोकशाहीच्या मूल्यांची जोपासणा केली पाहिजे,” असं म्हटलं आहे. ही पोस्ट करताना अजित पवारांनी महाराष्ट्र निवडणूक २०२४  अशा अर्थाचा हॅशटॅगही वापरला आहे.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!