अश्लील रिल्स शेअर करून ब्लॅकमेल करणारी इन्स्टाग्राम स्टारला अटक
काँग्रेस नेत्याच्या मदतीने मागायची खंडणी, इन्स्टावर आहेत लाखो फॉलोवर्स, मोठे खुलासे होणार
लुधियाना दि ७(प्रतिनिधी)- पंजाबमधील शेकडो लोकांना आपल्या जाळ्यात अडकवणाऱ्या ‘ब्लॅकमेलर हसीना’ जसनीत कौरचा पर्दाफाश झाला आहे. तिला लुधियाना पोलिसांनी अटक केली आहे. इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर जसनीत कौरला राजवीर या नावानेही ओळखले जाते.
जसनीतचे इन्स्टाग्रामवर हजारो फॉलोअर्स आहेत. अर्थात अश्लील रिल्स पोस्ट करून तिने हे फॉलोअर्स कमावले. शेकडो फॉलोअर्स तिला पर्सनल मेसेजेस करू लागले. यात अनेक गडगंज श्रीमंत लोकही होते. त्यामुळे त्यांना जाळ्यात अडकवून पैसे कमावण्याची संधी तिला दिसू लागली. अनेकांना ती आपले अश्लील फोटो पाठवायची. त्यानंतर संपर्कात येणाऱ्यांना ती पहिले प्रेमात पाडायची.
त्यांच्यासोबत वेळ घालवायची. आणि मग ब्लॅकमेल करून पैशांची मागणी करायची. जसनीतच्या जाळ्यात अनेक लोक आले आणि त्यांनी तिला बदनामी टाळण्यासाठी लाखो रुपये दिले. त्यामुळेच ती ७५ लाख रुपयांच्या बीएमडब्ल्यूमध्ये फिरायला लागली होती. अनेकांना तिचा हा प्रकार दिसत होता, पण पुरावे नसल्याने आणि हिंमत होत नसल्याने कुणीच तक्रार करत नव्हते. एका व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिला मोहालीतून अटक केली आणि आता पुढील दोन दिवस तिची कसून चौकशी होणार आहे. दोन दिवसांच्या कोठडीत जसनीतची चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. यातून अनेक मोठे खुलासे होऊ शकतात, असे मानले जात आहे. इतर लोकांसोबत केलेल्या ब्लॅकमेलिंगचा शोध घेण्यासाठी पोलीस तिच्या इंस्टाग्राम अकाउंटचीही चौकशी करत आहेत.जसनीतने आतापर्यंत किती लोकांना आपली शिकार बनवले याचा तपास केला जात असल्याचे पोलिस करत आहेत. तिचे जवळपास २ लाख फॉलोअर्स आहेत. जसनीतला एक काँग्रेस नेता लकी संधूही या कामात मदत करत असल्याचं समोर आले आहे.
जसनीत कौर ही संगरूरची रहिवासी आहे. तिच्या वडिलांचे निधन झाले आहे. यानंतर तिने पैसे कमावण्यासाठी इन्स्टाग्रामवर अॅडल्ट रील्स शेअर करायला सुरुवात केली. यामुळे तिचे फॉलोअर्स वाढतील आणि ती फेमस होण्याबरोबरच मोठी कमाईही करेल, अशी तिला आशा होती. मात्र, तिचा हेतू पूर्ण न झाल्याने तिने ब्लॅकमेलिंगचा मार्ग अवलंबला.