शाळेत गेलेल्या मुलाला आणायला रस्त्यावर का गेलीस?
क्षुल्लक कारणावरुन पतीने पत्नीबरोबर केले भयंकर कृत्य, अहवालानंतर पोलीसही आवक
बुलढाणा दि ७(प्रतिनिधी)- क्षणाचा राग आणि क्षुल्लक कारणावरून गुन्हेगारीच्या घटना वाढीस लागल्या आहेत. अशीच एक घटना बुलढाणा शहराच्या देऊळगाव राजा येथे घडली आहे. शाळेतून आलेल्या मुलाला घरात आणण्यासाठी बायको रस्त्यावर गेल्याने चिडलेल्या पतीने तिचा आवळून खून केला.
याप्रकरणात आधी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतर आरोपी पतीविरुद्ध ५ एप्रिल रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील भास्कर गीते असे आरोपीचे नाव आहे तर शिवकन्या सुनील गीते असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. घटनेच्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता शाळेतून येणाऱ्या मुलाला आणायला रस्त्यावर का गेली ? या कारणावरुन सुनिलने पत्नीशी वाद घातला. त्यानंतर रागात त्याने शिवकन्या गिते यांचा गळा आवळून खून केला. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी गेले. मात्र, ती चक्कर येऊन पडल्याचे पतीने सांगितले. पोलिसांनी महिलेच्या मृतदेह हा उत्तरीय तपासणीसाठी पाठवला होता. याचा अहवाल आल्याने त्याने खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी सुनील गीते यांनी खुनाची कबुली दिली आहे.
आरोपी सुनील गिते यास अटक करण्यात आली असून, त्यास आज न्यायालयापुढे हजर केले गेले. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय वाघमारे करीत आहेत.