सगे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी पाच महिने झालेत. जर करायचं असल्यास एवढा वेळ थोडाच लागतो. आज संध्याकाळपर्यंत कळेल काय विषय आहे. नाही कळलं तर सलाईन काढून टाकू, एखाद्या मंत्र्यावर विश्वास ठेवणे ही माझी चूक नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.दरम्यान, मराठा आरक्षण तसेच सगे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे.
सरकारनं मराठा आरक्षणाचा विषय तडीस नेहण्यात येईल, असे सांगितलं त्यामुळे उपचार घेतले. सलाईन लावली आहे. जर त्यांनी विषय तडीस नेहला नाही तर सलाईन पुन्हा काढता येईल, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. प्रकृती खालवल्यामुळे स्थानिकांच्या विनंतीनंतर मनोज जरांगे यांनी पहाटे अडीच वाजता उपचार घेतले. डॉक्टरांनी पहाटे मनोज जरांगे पाटील यांना सलाईन लावली. प्रकृती स्थिरावल्यानंतर मनोज जरांगे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा सरकारला मराठा आरक्षणाबाबतची आठवण करुन दिली.
सरकारच्या शब्दाला मान देऊन मी सलाईन लावली आहे. त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही तर पुन्हा सलाईन काढली जाईल. समजासाठी मी मरेपर्यंत लढणार आहे, असे मनोज जरांगे म्हणाले. अंतरवाली सराटी गावात जास्त गर्दी करु नका, असेही यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले.मराठा आरक्षणाचा विषय तडीस गेल्याशिवाय मी मागे हटणार नव्हतो. काल शुगर कमी झाल्याचं डॉक्टर म्हणत होते,विषय तडीस नेतो म्हणून सरकारकडून सांगण्यात आले. त्यामुोले सलाईन लावली, त्यांनी तडीस न नेल्यास सलाईन पुन्हा काढता येईल, असे मनोज जरांगे म्हणाले.
आमदार राजेंद्र राऊत निरोप घेऊन आले होते. ते कोणत्याही पक्षाचे आमदार असो, ते कोणत्याही पार्टीचा आमदार असो, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. मात्र मदतीसाठी ते प्रयत्न करत आहेत, त्यामुळे चर्चा तर घडून आलीच पाहिजे. ते सरकारकडे जात आहेत आणि येत आहेत. सरकारने त्यांच्याकडे सांगितले आहे आम्ही ताबडतोब निर्णय घेऊ. फक्त सलाईन घ्यावी.सरकारच्या शब्दाला मान देऊन मी सलाईन घेतली. त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही तर पुन्हा ससलाईन काढू. मी समाजासाठी मरेपर्यंत लढणार आहे, असे मनाजो जरांगे म्हणाले.