Latest Marathi News
Ganesh J GIF

पुणे शहरातील रस्ते खड्यात कि खड्ड्यामध्ये रस्ते शोधणे अवघड

सापडत नसलेल्या रस्त्यावर उतरून पुणे महानगरपालिका प्रशासना विरोधात आपची घोषणाबाजी

पुणे दि २८(प्रतिनिधी)- सद्या पावसाळा चालू होऊन थोडीच दिवस झाले आहेत आणि करोडो रुपयांचा खर्च दाखऊन पुणे महानगर पालिकेने जे रस्ते बांधले त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे, सर्व सामान्य नागरिकाना पडलेल्या मोठ मोठ्या खड्या मध्ये रस्ता शोधावा लागत आहे.

पावसाळा सुरु होताच प्रत्येक वर्षी पुणेकारांना खड्या मध्ये रस्ते सोधण्याची करावी लागणारी कसरत थांबावी आणि पुणे महानगर पालिकेचा भ्रष्ट कारभार लोकाना दिसावा या हेतूने ‘आम आदमी पार्टी, हडपसर’ यांच्या वतीने आज खड्या मध्ये झाडे लावण्याचा व साचलेल्या पाण्यात होडी सोडण्याचा कार्यक्रम आयोजीय केला होता. प्रत्येक वर्षी हजारो कोटींचा टॅक्स महानगरपालिका पुणे करांकडून वसूल करते पण तशा सुविधा मात्र मिळत नाहीत. आम आदमी पार्टी, हडपसर यांच्या वतीने रस्त्यावरील खड्यात सापडत नसलेल्या रस्त्यावर उतरून पुणे महानगरपालिका प्रशासना विरोधात घोषणाबाजी करण्यात आली .

या प्रसंगी सचिन कोतवाल, स्वप्निल गोरे, महाराष्ट्र अलर्ट सिटीजन फोरमच्या वतीने दिपाली सरदेशमुख यांचे व इतर अनेक नागरिकांचे समर्थन लाभले, तसेच अशोक हरपळे, सुनील हरपळे, शहाजी मोहिते, रवि लाटे, शुभम हांगे व हडपसर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!