ऐकावे ते नवलच! विठ्ठल मंदिरात सजावट केलेले द्राक्षे गायब
पंढरपुरच्या मंदिरात असं काय घडलं? द्राक्ष कोणी गायब झाल्याची होतेय चर्चा
पंढरपूर दि ३(प्रतिनिधी)- आमलकी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिराला सजावट करण्यासाठी पुण्यातील एका भविकाने तब्बल १ टन द्राक्ष दिले. दारम्यान, हे द्राक्ष आज सकाळी अर्ध्या तासात गायब झाले आहेत.हे द्राक्ष नेमके कुणी खाल्ले असा प्रश्न द्राक्ष दिलेल्या भविकाने विचारत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
आमलकी एकादशी निमीत्त पुणे येथील भाविक सचिन चव्हाण आणि बारामतीचे बाळासाहेब शेंडी यांच्या वतीने विठ्ठल-रुक्मीणी मंदिरात ही द्राक्षांची आरास करण्यात आली होती. यासाठी तब्बल एक टन इतकी द्राक्ष वापरण्यात आली होती. द्राक्षांची चर्चा मंदिरातून एक टन द्राक्षे गायब झाल्यापासून पंढरपुरातील प्रभावशाली व सर्वसामान्य नागरिक या घटनेची चौकशी करण्याची मागणी करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे सजावटीनंतर भाविकांना दर्शन सुरु झाले. अर्ध्या तासात एक टन द्राक्षंपैकी एकही मणी शिल्लक राहिला नव्हता. दर्शनाला आलेल्या भाविकांनी ही द्राक्षे खाल्ल्याचा दावा केला जात आहे. मात्र दर्शन रांगेच्या बाहेर लावलेले शेकडो द्राक्षांचे घड कोणी पळवले याची चर्चा सुरु आहे. सकाळी करण्यात आलेल्या आरासमुळे गाभाऱ्यास मनमोहक असे द्राक्षवेलीचे स्वरूप प्राप्त झाले होते. पण हा आनंद अल्प काळ टिकला.
दर्शन रांगेच्या बाहेर लावलेले शेकडो द्राक्षांचे घड कोणी पळवले याची चर्चा सुरु या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. शोध मंदिर प्रशासनाने तातडीने लावावा आणि असे प्रकार पुन्हा होऊ नयेत अशी मागणी विट्ठल भक्तांनी केली आहे.