
ठरल! अनेकांची क्रश असणारी अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार
पोस्ट शेअर करत दिली गुड न्यूज, म्हणाली, आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा, कोण आहे होणारा नवरदेव
पुणे – ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत येसूबाईंच्या भूमिकेत झळकलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडला आपण विविध सिनेमा, मालिकांमधून अभिनय करताना पाहिलंय.नुकतंच प्राजक्ताने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. अभिनेत्री लवकरच विवसहबंधनात अडकणार आहे.
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये प्राजक्ताने गळ्यात भलामोठा हार, दागिने घातलेलं दिसून येत आहे. कपाळावर कुंकू , आजूबाजूला असलेले पाहुणे सगळंकाही या फोटो मध्ये दिसून येत आहे. तीने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती नवरीसारखी सजलेली दिसते. फोटोमध्ये तिने पिवळी साडी, फुलांचा हार, हातांवर मेहेंदी घातली आहे. या फोटोंखाली तिने ‘ठरलं’ आणि ‘पाहुणे मंडळी’ असे कॅप्शन दिले, त्यामुळे तिचं लग्न ठरल्याचं संकेत चाहत्यांना मिळाला आहे. याचसोबत “प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा” असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. प्राजक्ता गायकवाडचा होणारा नवरा कोण हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. अभिनेत्रीने याविषयी अद्याप खुलासा केला नाहीये. त्यामुळे प्राजक्ताचा होणारा नवरा कोण याची उत्सुकता शिगेला आहे. प्राजक्ताने लग्नाचा खुलासा केल्याने ती होणाऱ्या नवऱ्याबद्दलही लवकरच सांगेल, अशी शक्यता आहे. प्राजक्ताच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल काहीच माहिती दिलेली नाही. फोटोमध्ये तो व्यक्ती कुठेच दिसत नाही. त्यामुळे तिचे लग्न कोणाशी होणार याबाबत सगळ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे प्राजकाचा होणारा जोडीदार कोण आहे याबद्दल ती कधी खुलासा करणार हे पाहण महत्त्वाचं आहे. या पोस्टनंतर प्राजक्ताला सोशल मीडियावरून अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शेअर केलेल्या फोटोंमधील प्राजक्ताचा सोज्वळ साज पाहून चाहतेही तिच्या प्रेमात पडले आहेत. तसेच चाहते आता अभिनेत्रीचे लग्नातले फोटो पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
प्राजक्ताच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, ‘आई माझी काळूबाई’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ अशा मालिकांमध्ये तिने अभिनय केला. यानंतर तिने अनेक मराठी मालिका तसेच चित्रपटांमध्येही काम केले. प्राजक्ताच्या नवीन प्रोजेक्टबद्दल अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही.