
‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात’
एकनाथ शिंदेचा जय गुजरातचा नारा, मराठी अमराठी वादात नव्या घोषणेमुळे शिंदे अडचणीत, अमराठी मतासाठी गुजरातचा नारा?
पुणे – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान “जय गुजरात” अशी घोषणा दिल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना सुरुवात झाली आहे. गुजराथी समाजाच्या कार्यक्रमातील या घोषणेने शिंदे अडचणीत आलेत.
पुण्यातील गुजराती समाजच्या एका स्थानिक संघटनेने खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते, ज्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे प्रमुख पाहुणे होते. तर त्याचसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील सहभागी झाले होते. एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणादरम्यान अमित शाह यांचं प्रचंड कौतुक केलं. तसेच २०२२ साली शिवसेनेत झालेल्या बंडाबद्दल बोलताना अमित शहां यांनी आपल्याला कशी साथ दिली. हे देखील सांगितले. यानंतर भाषण संपवताना मात्र एकनाथ शिंदेंनी जय गुजरात असा जाणीवपूर्वक उल्लेख केला. एकनाथ शिंदे यांनी भाषणाच्या शेवटी, ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’, असे म्हटले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांना काहीतरी आठवले आणि त्यांनी पुन्हा माईकपाशी येऊन ‘जय गुजरात’, असे म्हटले. ज्यामुळे आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. या घोषणेनंतर विरोधकांनी शिंदेंवर थेट ‘महाराष्ट्र द्रोह’ केल्याचा आरोप लावला आहे. शिंदेंच्या या घोषणेला निवडणुकीपूर्वी अमराठी मतांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले आहेत. यावर अद्याप शिंदे किंवा त्यांच्या समर्थकांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र फडणवीस यांनी मात्र गुजराथी समाजाचा कार्यक्रम असल्यामुळे शिंदे जय गुजरात म्हटले अशी सारवासारव देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
उपमुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. हा केवळ एक सहज उद्गार होता की, यामागे काही राजकीय संदेश दडला होता, यावर आता तर्क-वितर्क लढवले जात आहेत. आगामी काळात या घोषणेचे राजकीय पडसाद कसे उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.