‘खामोश, यहां के असली खिलाडी हम है’ जयंत पाटलांचा स्वॅग
मुलाच्या लग्नात जयंत पाटलांनी धरला ठेका, काॅलर उडवत अनोखा अंदाज
सांगली दि २४(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री आमदार जयंत पाटील आपल्या हजरजबाबी स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. टप्प्यात आला की करेक्ट कार्यक्रम हा त्यांच्या डायलाॅग सर्वांनाच माहित आहे. पण आपल्या मुलाच्या लग्नात नवीन डायलाॅग म्हणत जयंत पाटलांनी बेदुंधपणे डान्स केला आहे. त्यांचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
जयंत पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन आणि प्रतीक या दोघांच्या समवेत जयंत पाटील “यांनी यहां के असली खिलाडी हम है” हा डायलॉग म्हणत गाण्यावर ठेका धरला. या पिता-पुत्राच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आमदार जयंत पाटील यांच्या मोठ्या मुलाचं लग्न सोहळा २७ नोव्हेंबरला पार पडणार आहे. त्या निमित्ताने संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी जयंत पाटील यांनी ठेका धरला होता. विशेष म्हणजे “खामोश, यहां के असली खिलाडी हम है, असं म्हणत जयंत पाटलांनी स्टेजवर एन्ट्री घेत कॉलर उडवली होती त्यामुळे त्यांच्या एंट्रीची देखील जोरदार चर्चा होत आहे.
जयंत पाटील यांच्या एका मुलाचं लग्न मागच्याच वर्षी मुंबईत पार पडलं होतं. त्याने मुलीला आयफेल टॉवरवर प्रपोज केल्याचा किस्सा स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितला होता.त्यावेळी शरद पवार यांनी म्हटलं होतं की, जयंतरावाच्या मुलानं पॅरिसच्या आयफेल टॉवरवर जाऊन एका मुलीला प्रपोज केलं. दोघांचं जुळलं, पण आमची पोरं काय करतील याचा नेम नाही. असे म्हणत पवारांनीही दाद दिली होती.