पुणे दि २४(प्रतिनिधी) – पुण्यातील ४४ वर्षीय तरुणाला घटस्फोट देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्या व्यक्तीने आपली पत्नी एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचा खोटा दावा केला होता, ज्यामुळे त्याला मानसिक त्रास झाला असल्याचा त्याने दावा केला होता. पण न्यायालयाने दणका देत घटस्फोटास नकार दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, याचिकाकर्त्याचे मार्च २००३ मध्ये दोघांचे लग्न झाले होते. त्यानंतर त्या व्यक्तीने असा दावा केला की, त्याची पत्नी विक्षिप्त, हट्टी आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना योग्य वागणूक देत नाही. यानंतर पत्नीला टीबीचा त्रास असल्याचा दावा त्याने केला. तर २००५ मध्ये, त्याच्या पत्नीची एचआयव्ही चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याचा दावा करत घटस्फोट मागितला होता. महिलेने एचआयव्हीसाठी निगेटिव्ह चाचणी केली सादर केली होती. तरीही पतीने कुटुंबातील सदस्यांमध्ये अफवा पसरवल्या, ज्यामुळे तिला मानसिक त्रास झाला. पण न्यायालयात त्याला कोणताही पुरावा सादर करता न आल्याने न्यायालयाने पतीची घडस्फोटाची मागणी फेटाळून लावली आहे. व्यक्तीने यापूर्वी पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली. यानंतर त्यांनी कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
न्यायमूर्ती नितीन जामदार आणि शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशात त्या व्यक्तीची याचिका फेटाळून लावली आहे. वैद्यकीय अहवाल असूनही याचिकाकर्त्याने पत्नीसोबत राहण्यास नकार दिला आणि नातेवाईक आणि मित्रांना एचआयव्ही असल्याची माहिती देऊन समाजात पत्नीची बदनामी केली, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.