
येत्या 4 जूनला इंडिया आघाडीचं सरकार सत्तेवर येईल आणि देशातलं ‘जुमला’ पर्व संपेल आणि ‘अच्छे दिन’ची सुरुवात होईल असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. शनिवारी सकाळी इंडिया आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली.यावेळी उद्धव ठाकरे यांनी मोदी आणि भाजप सरकारवर कडाडून हल्ला चढवला.
महाराष्ट्राची लूट केली जात आहे, राज्याला बदनाम केलं जातंय. तसेच शासकीय यंत्रणांचा दुरूपयोग केला जातोय. भाजपकडून भ्रष्टाचाऱ्यांचा सन्मान केला जातो अशी टीका त्यांनी केली.आजच्या एका वृत्तपत्रात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नडडा यांची मुलाखत छापून आली आहे. त्यात त्यांनी म्हटलं की सुरूवातीला भारतीय जनता पक्ष हा कमी ताकदवान होता, आम्हाला संघाची गरज होती. पण आता आम्ही सक्षम आहोत. हे पाहता आता संघाला नष्ट करतील असं दिसतंय. हे १००वं वर्ष संघासाठी धोक्याच ठरेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. भाजप एककल्ली कारभार देशात सुरू ठेवेल. ही हुकूमशाहीची सुरूवात आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.