Latest Marathi News
Ganesh J GIF

चक्क…पोलीस उपनिरीक्षकावरच हल्ला…बघा नेमकं प्रकरण काय ?

गुन्हेगारीच्या घटनांनी अक्षरश: टोक गाठलं आहे. मुंबईच्या दहीसरमध्ये ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर काल गोळीबाराची घटना घडली. त्याआधी चाळीसगावात भाजपच्या माजी नगरसेवकावर गोळीबाराची घटना घडली होती. तसेच गेल्या आठवड्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या शहरप्रमुखावर पोलीस ठाण्यात गोळ्या झाडल्या होत्या. यानंतर सातत्याने गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. जळगावमध्ये दोन दिवसांपूर्वी मद्यधुंद तरुणांनी एका हॉटेल मालकासह स्थानिक 17 ते 18 नागरिकांना अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यात पोलीस उपनिरीक्षकावर ढाबा चालकाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मंगळवेढा तालुक्यातील मरवढे येथील उशिरापर्यंत सुरू ठेवलेल्या ढाब्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षक अंकुश वाघमोडे आणि गाडी चालकावर ढाबा चालकासह सात ते आठ जणांनी लाठ्या काठ्यांनी हल्ला केला. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या घटनेवर स्थानिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच संबंधित परिसरात आरोपींची दहशत किती आहे ते या प्रकरणातून समोर येत आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. या घटनेत पोलीस उपनिरीक्षक अंकुश वाघमोडे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मंगळवेढा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नेमकं प्रकरण काय?

मरवढे येथील महाराजा ढाबा रात्री उशिरापर्यंत सुरू होता. ढाबा उशिरापर्यंत का सुरू ठेवला ? बंद करा असे सांगताच,ढाबा चालकासह इतर सात ते आठ अनोळखी तरूणांनी पोलीस उपनिरीक्षक अंकुश वाघमोडे आणि गाडी चालकाला मारहाण केली. आरोपींनी पोलीस उपनिरीक्षक आणि त्यांच्या गाडी चालकाला लाकडी दांडके, काठ्यांनी डोक्यात आणि हाता पायावर मारून गंभीर जखमी केलं आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अंकुश वाघमोडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर चालक किरकोळ जखमी झाला आहे. या प्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात ढाबा चालकासह इतर संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. हॉटेल मालकाचे नाव समीर मुजावर असे आहे. तर चालक पोलीस हवालदाराचं नाव अंसारी असं आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!