भारतीय जनता पक्षाला अनुकूल भूमिका घेणारी आणि काँग्रेसवर सातत्याने टीका करणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतला लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपने कंगनाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने रविवारी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. विविध राज्यांत मिळून एकूण १११ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यात प्रामुख्याने श्रीरामाची भूमिका साकारणारे अरूण गोयल यांना उत्तर प्रदेशच्या मेरठमधून तर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला हिमाचलच्या मंडीमधून संधी देण्यात आली आहे.
अभिनेत्री कंगना रणौत बॉलिवूडमधील मोठं नाव पदार्पणाच्याच चित्रपटात कंगनाला दमदार भूमिका मिळाली, तिच्या कामाचं कौतुकही झालं. त्यानंतर अभिनेत्री म्हणून कंगनानं ‘क्वीन’, ‘तनू वेड्स मनू’, ‘मनकर्णिका : द क्वीन ऑफ झाँसी’ अशा अनेकविध कलाकृतींतून स्वतःला सिद्ध केलं. स्पष्टवक्ती आणि बॉलिवूडमधल्या वंशवादाबद्दल आवाज उठवणारी अभिनेत्री म्हणूनही ती सातत्यानं चर्चेत राहिली. सिनेक्षेत्रात कार्यरत असताना तिने आपल्या राजकीय महत्त्वकांक्षा कधीच लपवून ठेवल्या नाहीत भारतीय जनता पक्षाला कायम अनुकूल भूमिका ती घेत राहिली, आज तिला उमेदवारी जाहीर झाली आहे