
किंगमेकर ग्रुप अध्यक्षाला टोल नाक्यावर बेदम मारहाण
मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, टोल नाक्यावर या कारणामुळे झाली बेदम धुलाई, किंगमेकर वादात?
नाशिक – किंगमेकर ग्रुप अध्यक्ष येवला, भैय्या गायकवाड, असं म्हणत व्हिडिओ करणारा रील स्टार भैय्या गायकवाड प्रसिद्ध आहे. पण त्याला अनेकदा ट्रोलिंगला देखील सामोरे जावं लागलं आहे. याच भैय्या गायकवाडला टोल कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली आहे. याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे.
संभाजीनगरच्या सावंगी येथे समृद्धी महामार्गावर ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. गाडीला फास्ट टॅग नसल्यावरून भैय्या गायकवाड आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. भैय्या गायकवाड कर्मचाऱ्यांशी उद्धटपणे बोलला आणि वागला असल्याने त्याला मारहाण झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, त्याला मारहाण होत असल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या घटनेचा व्हिडिओ टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनीच रेकॉर्ड केला असल्याचे बोलले जात आहे. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. ही घटना नेमकी कधी घडली? हे अद्याप समजू शकलेलं नाही. त्याचबरोबर या घटनेच्या संदर्भात भैय्या गायकवाड याची प्रतिक्रिया देखील अद्याप समोर आलेली नाही
गरीब लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाच्या कार्यालयांना फोन करणे आणि त्याचवेळी त्याचे रील्स बनवणे यामुळे तो चर्चेत असतो. पण ‘रीलस्टार’ म्हणून लोकप्रिय झालेला भैय्या आता मारहाणीमुळे वादात अडकला आहे.