Latest Marathi News
Ganesh J GIF

ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना अटक, ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट

ललित पाटीलचे ते फोटो व्हायरल, मैत्रीणींकडून नवीन माहिती मिळणार?, आरोप प्रत्यारोपाची फैरी

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- ललित पाटील प्रकरण सध्या राज्यात कमालीचे गाजत आहे. या प्रकरणी रोज नवे दावे आणि गाैप्यस्फोट केले जात आहेत. जेंव्हा ललित पाटीलला अटक करण्यात आली होती, तेंव्हाच त्याने धक्कादायक खुलासा करत आपल्याला पळून जाण्यात मदत केली होती. असा दावा केला होता. पण पोलीसांनी आता या प्रकरणी ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना अटक केली आहे. पुणे पोलीसांनी ही कारवाई केली आहे.

पुण्यातील ससुन रुग्णालयातून पळून गेलेल्या ड्रग्स माफियाला मुंबई साकीनाका पोलिसांनी बंगलोर येथून अटक केली आहे. ललित पाटील हा बंगलोर येथून चेन्नई आणि त्यानंतर श्रीलंकेला पळून जाणार होता. पण त्याआधीच त्याला अटक करण्यात आली. पण आता पोलीसांनी ललित पाटीलच्या दोन मैत्रिणी प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम यांना अटक करण्यात आली आहे. ललित पाटील याला पळून जाण्यास त्याच्या दोन मैत्रिणींनी मदत केल्याचे तपसात पुढे आले होते. ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर या दोघी ललित पाटलाच्या संपर्कात होत्या. एवढेच नाही तर पाटील हा फरार असताना तो या दोघींच्या सातत्याने संपर्कात होता. ललित पाटील पळून गेल्यावर नाशिकला गेला. यावेळी मैत्रीण प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम ह्यांनी त्याला २५ लाख रुपये दिले. हे पैसे घेऊन तो पसार झाला होता. आता दोघींना २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यातच आता ललितचे त्याच्या मैत्रीणीबरोबरचे फोटो व्हायरल झाले आहेत. ललित पाटीलचे पहिले लग्न झाले होते. मात्र त्याच्या बायोकोचा अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर तो कायम या दोघींच्या संपर्कात होता. विशेष म्हणजे प्रज्ञा ही व्यवसायाने वकील असून ललितच्या बऱ्याच व्यवहारामध्ये तिचा सहभाग आहे. अर्चना हिला ललित पाटील करत असलेल्या ड्रग्जच्या उद्योगाची पूर्ण माहिती होती. त्याच पैशातून खरेदी केलेली तब्बल सात किलो चांदी ही पोलिसांनी अर्चना कडून हस्तगत केली आहे.

ललित पाटील याचे आणखी काही धक्कादायक फोटो व्हायरल झाले आहेत. त्या फोटोमध्ये रुग्णालयातील कैदीत त्याचे अलिशान जीवन जगत असल्याचे दिसत आहे. पण आता हे फोटो समोर आल्यामुळे पोलीस प्रशासनावर जोरदार टिका होत आहे. आता या प्रकरणी आणखी काय खुलासे होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!