Just another WordPress site

आघाडीची मराठी अभिनेत्री अभिनयाला ठोकणार रामराम?

इन्स्टाग्राम पोस्टने चर्चेला उधान, नव्या इनिंगला सुरुवात करत सांगितला प्लॅन

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- चित्रपट सृष्टी ही मायावी नगरी आहे. यात बरेच अभिनेते अभिनेत्री अभिनयाबरोबरच एखादा व्यवसाय सुरु करतात. क्रांती रेडकर, प्राजक्ता माळी, ही त्यातील काही नावे आहेत त्यात आता आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे. पण त्या अभिनेत्री अभिनय क्षेत्र सोडण्याचे संकेत दिले आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वातील स्पर्धक अभिनेत्री वीणा जगताप यांनी तसे संकेत दिले आहेत.

GIF Advt


अभिनेत्री वीणा जगतापने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे मी एक नवी सुरुवात करत आहे असे तिने म्हटले आहे. या पोस्टमध्ये वीणाने शेअर केलेल्या फोटोत ती एका मुलीला मेकअप करताना दिसत आहे.  “किसी को घर से निकलते ही मिल गई मंज़िल, कोई हमारी तरह उम्र भर सफ़र में रहा. मी माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहे. मी आशा करते की हा नवा प्रवास चांगला असेल.” अशा भावना तिने आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केल्या आहेत. यावर चाहत्यांनी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करणार का? असा प्रश्न विचारल्यावर का नाही असा प्रतिप्रश्न विचारत नवे संकेत दिले आहे. पण त्याचबरोबर अभिनय क्षेत्र सोडण्यावर देखील अप्रत्यक्ष भर दिला आहे.

शिव ठाकरे आणि वीणा जगताप यांच्या रिलेशनपवरही खूपच चर्चा झाली होती. पण नंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. वीणाने जेव्हा सोशल मीडियावरून शिवला पाठिंबा दिला होता तेव्हा अनेकांनी ते परत एकत्र येतील असा अंदाज बांधला होता. तसेच अनेकदा वीणा शिव १६ वा सीझन जिंकावा यासाठीही प्रार्थना करताना दिसली होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!