
नव्या व्हायरलमुळे भारतात पुन्हा लाॅकडाऊन होणार?
HMPV व्हायरलचा भारतात आढळला पहिला रुग्ण, सरकार अलर्ट, ही आहेत लक्षणे
दिल्ली – कोविड-१९ म्हणजेच कोरोनाच्या धक्क्यातून जग आता जग सावरले आहे. पण हा आनंद अल्पच ठरण्याची शक्यता आहे. कारण चीनमध्ये पुन्हा एकदा धोकादायक व्हायरसने थैमान घातले आहे. ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस म्हणजेच HMPV या नावाचा हा व्हायरस असून आता त्याचा शिरकाव भारतात झाला आहे.
भारतात पहिला रुग्ण बंगळुरूमधील एका रुग्णालयात आठ महिन्यांच्या मुलीमध्ये आढळला आहे. या व्हायरसने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले असून, यावर खबरदारीचे उपाय सुरू आहेत. या व्हायरसची लागण बंगळुरुतील एका ८ महिन्याच्या मुलाला झाली आहे. ताप आल्याने बाळाला शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. बंगळुरुच्या लॅबने ही पुष्टी केली आहे. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अद्याप या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये श्वास घेण्यास त्रास होणे आणि फ्लूसारखी लक्षणे दिसून येतात. आता दिल्लीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तसेच कर्नाटकच्या आरोग्य विभागानं विषाणूशी संबंधित आव्हानांचा सामना करण्यासाठी यासंदर्भात एक परिपत्रक जारी केलं आहे. यामुळे पुन्हा एकदा लाॅकडाउन होणार का नाही? हे पाहणे महत्त्वाचे आहे. एचएमपीव्ही विषाणू तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे. हा विषाणू सर्वप्रथम नेदरलँड्समध्ये २००१ साली आढळून आला होता.
अशी घ्या काळजी
खोकला किंवा शिंका येत असतील तेव्हा तोंड आणि नाक हे रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकून ठेवावे.
साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने हात वारंवार धुवावे.
ताप, शिंका, खोकला येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर रहा.
भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक अन्न खा.
संसर्गाची शक्यता कमी करण्यासाठी हवा खेळती राहील याची काळजी घ्या.