
‘मॅच हरलो, युद्ध जिंकलो’ या क्रिकेटपटूच्या पत्नीने भारताला डिवचले
पाकिस्तानी क्रिकेटपटूची मैदानात भारतीयांना डिवचणारी कृती, पत्नी सपोर्टला आली पण ट्रोल झाली, पाकची मग्रुरी कायम
पुणे – भारतीय संघाने पाकिस्तानला आशिया कप २०२५ स्पर्धेच्या सुपर फोर फेरीतही ६ विकेट्सने पराभूत केले. मात्र, या सामन्यात पाकिस्तानी गोलंदाज हॅरिस रौफने त्याने पाकिस्तानने भारताचे ६ विमान पाडल्याच्या दाव्यावरून एक वादग्रस्त केली होती. ज्यावरून तो बराच ट्रोल होत आहे. पण या वादात आता त्याच्या पत्नीने उडी घेतली आहे.
हॅरिस रौफची पत्नी मुझना मसूद मलिक हिनेही त्याच्या या कृतीला समर्थन देत सोशल मीडियावर एक पोस्ट केली, ज्यात तिने ‘सामना हरलो, युद्ध जिंकलो.’ असे कॅप्शन दिले होते. मात्र यानंतर मुझना मसूद मलिकही मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली, ज्यानंतर तिने ही पोस्ट काही वेळातच डिलिट केली. मात्र यानंतर तिच्याबद्दल चर्चा होत आहे. भारतविरुद्धच्या सामन्यात हारिस रौफ भारतीय फलंदाजांना वारंवार चिथवण्याचा प्रयत्न करत होता. तसेच दुसऱ्या डावात म्हणजेच भारत जेव्हा फलंदाजी करत होता, त्यादरम्यानचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ मैदानात फलंदाजी करत असताना मैदानातील प्रेक्षकांना हाताने एअरक्राफ्ट पाडल्याची अॅक्शन करुन दाखवत आहे. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या रौफला स्टेडियममधील भारतीय चाहत्यांनी थेट त्याची जागा दाखवून दिली. पाकिस्तान सरकराने युद्धात भारताचे ६ विमान पाडल्याचा दावा केला होता आणि पाकिस्तान क्रिकेटपटू त्यावरूनच ही चिडवाचिडवी करत होते. यातही हॅरिस रौफ आघाडीवर होता. तर दुसरीकडे सलामीवार फरहानकडून गनफायर सेलिब्रेशन केले गेले. त्यानंतर रौफने टीम इंडियाचे सलामीवीर फलंदाजीला आलेले असताना मुद्दाम भांडण केलं. इतकंच नव्हे त्याने भारतीय चाहत्यांनाही हातवारे करून डिवचले. दरम्यान या सामन्यात भारताने पाकिस्तानचा सलग दुसऱ्यांदा पराभव केला.
मुझनाचा जन्म २० ऑक्टोबर १९९७ मध्ये रावळपिंडीमध्ये जन्म झाला. ती फॅशन मॉडेल आणि सोशल मिडिया इन्फ्ल्युएंसर आहे. तिने इस्लामाबादमधील इंटरनॅशनल इस्लामिक युनिव्हर्सिटीमधून मास मीडियामध्ये पदवीचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर तिने फॅशन डिझाईनमध्ये उच्च शिक्षण घेतले. तिने हॅरिस रौफबरोबर २३ डिसेंबर २०२२ मध्ये लग्न केले.