
संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद अखेर पार पडली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा असलेल्या 48 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्यात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. 19 एप्रिलला सुरुवात होणार असून 26 मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर 6 जून रोजी या सर्व जागांचा निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रामध्ये 48 मतदारसंघासाठी, 19 एप्रिल रोजी मतदानाला सुरुवात होईल.
पहिला टप्पा
19 एप्रिल रोजी मतदान
या जिल्ह्यात होणार मतदान : रामटेक, नागपूर, भंडारा – गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
दुसरा टप्पा
26 एप्रिल रोजी मतदान
या जिल्ह्यात होणार मतदान : बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
तिसरा टप्पा
7 मे रोजी मतदान
या जिल्ह्यात मतदान : रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणगंले,
चौथा टप्पा
13 मे रोजी मतदान
या जिल्ह्यात मतदान : नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ,पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड
पाचवा टप्पा
20 मे रोजी मतदान
धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिंवडी, कल्याण, ठाणे, दक्षिण मुंबई, वेस्ट दक्षिण मुंबई, पूर्व मुंबई, मध्य उत्तर मुंबई, मध्य दक्षिण मुंबई, दक्षिण मुंबई
तर 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रामध्ये मागील अडीच वर्षांमध्ये राजकीय उलथापालथ झाली. आधी महाविकास आघाडी सत्तेतं आलं आणि त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली. त्यानंतर आता महायुती सरकार स्थापन झालं आहे. राज्यात एकूण 48 लोकसभा जागा आहे. त्यासाठी निवडणूक होणार आहे. कोणत्याही उमेदवाराची माहिती देणे बंधनकारक असणार आहे. त्याच्यावर किती गुन्हे आहे, त्याची संपत्ती किती आहे, याची माहिती मतदारांना केवायसी नावाच्या अॅपलिकेशनमध्ये पाहण्यास मिळणार आहे. ज्या उमेदवारावर गुन्हे दाखल आहे, त्याला 3 वेळा वृत्तपत्र आणि टीव्हीमध्ये जाहिरात द्यावी लागणार आहे. तसंच राजकीय पक्षांना सुद्धा गुन्हेगार असलेल्या उमेदवाराला तिकीट का दिलं याचं स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे.