Latest Marathi News
Ganesh J GIF

नगरमध्ये महायुतीचे सुजय विखे आघाडीवर, निलेश लंके पिछाडीवर

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यात काटे की टक्कर होत आहे. या हाय व्होल्टेज लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून सुजय विखे पाटील यांनी अहमदनगरमधून आघाडी घेतली आहे . तर निलेश लंके हे पिछाडीवर आहेत.अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सुजय विखे यांनी पहिल्या फेरी अखेर 3613 मतांनी आघाडी घेतली. पहिल्या फेरीत सुजय विखे यांना 25653 एवढी मतं मिळाली. तर निलेश लंके यांना 22040 एवढी मतं मिळाली. तर अहमदनगर लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या फेरी अखेर सुजय विखे 4729 मतांनी आघाडीवर आहेत.

नाशिक लोकसभा मतदारसंघात चौथ्या फेरी अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ भाऊ वाजे यांना 1 लाख 15 हजार 709 मते मिळाली आहे. हेमंत गोडसे 79 हजार 369 36 हजार 340 मतांनी राजाभाऊ वाजे आघाडीवर रावेर लोकसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या फेरीत भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांना 99 हजार 555 मते मिळाली आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांना 73 हजार 223 मते मिळाली. 26 हजार 332 मतांनी रक्षा खडसे आघाडीवर आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!