Latest Marathi News
Ganesh J GIF

महिला पोलिसाला वर्दीत रील बनवणे पडले महागात, मोठी कारवाई

महिला पोलिसाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल, काय होते व्हिडिओत, नेमके प्रकरण काय?

लखनऊ दि १०(प्रतिनिधी)- सोशल मिडीयावर सध्या अनेकजण रिल्स टाकत असतात. त्याचबरोबर अनेकजण असे व्हिडिओ आवडीने पाहत असतात. पण कधी कधी असे व्हिडिओ बनवणे आणि सोशल मिडीयावर टाकणे चांगलेच महागात पडू शकते. असाच काहीसा प्रकार उत्तरप्रदेशमध्ये समोर आला आहे. एका महिला पोलिसाने वर्दीत व्हिडिओ शुट करून सोशल मिडीयावर पोस्ट केल्याने तिचे निलंबन करण्यात आले आहे.

कॉन्स्टेबल आरती सोलंकी यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. त्यांनी १९८० मध्ये अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांची मुख्य भूमिका असलेला अॅक्शन ड्रामा ‘दोस्ताना’ चित्रपटामधील ‘जिंदगी ने दी हवा, थोडा सा धुआ उठा, और आग जल गयी, तेरी मेरी दोस्ती प्यार में बदल गई’ हे आशा भोसले- किशोर कुमार यांच्या आवाजातील गाण्यावर रील बनवले होते. पण हे रील बनवताना त्यांनी पोलिसाचा गणवेश घातला होता. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. पण यामुळे आरती यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कासगंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडिया सेलद्वारे व्हिडिओचा तपास करण्यात आला. त्यानंतर जिल्ह्यातील सहावर पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या महिला कॉन्स्टेबल आरती सोलंकी यांनी बनवलेल्या रीलची चौकशी करुन त्यांना निलंबित करण्यात आले आहे. शिवाय विभागीय कार्यवाही सुरू केल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यावर आता समिश्र प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत. सोलंकी यांची चौकशी केली असता त्यांनी कर्तव्यावर असताना यापूर्वीही असे रिल बनवले होते असे उघड झाले आहे. यामुळे पोलीस अधीक्षकांनी तत्काळ सोलंकी यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.

सोलंकी या अॅक्टिव्ह इन्स्टाग्राम युजर आहेत. त्या वारंवार त्यांच्या पोलिसी गणवेशातील स्वतःचे व्हिडिओ शेअर करत असतात. ज्या व्हायरल व्हिडिओमुळे त्यांचे निलंबन झाले, तो सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. दरम्यान आरती यांची प्रतिक्रिया भेटू शकली नाही.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!