Latest Marathi News
Ganesh J GIF

मनोज जरांगेंचं ठरलं, विधानसभा निवडणूक लढवणार

सरकारने आरक्षण दिले नाही तर मराठा आंदोलक मनोज जरांगे विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी 127 जागांवर पहिला सर्व्हेदेखील केला आहे.खुद्द जरांगे यांनी एबीपी माझाशी बोलताना ही घोषणा केली आहे. मात्र ते स्वतः निवडणूक लढवणार नाहीत.. स्वतःचा पक्ष काढून उमेदवार उभे करायचे की अपक्ष म्हणून उभे करायचे हे अजून ठरलेलं नाही. वेळ आली तर मराठा, मुस्लिम आणि दलित, लिंगायत यांची मोट बांधून निवडणूक लढवणार असंही जरांगेंनी सांगितलंय.

मनोज जरांगे म्हणाले, सरकारला मी वेळ दिलेला नाही, सरकारने वेळ घेतला आहे. मी अगोदर देखील सांगितले होती की, आम्ही तयारी करतोय. माझा आणि माझ्या समाजाचा दोघांचाही राजकरणात येण्याचा कोणताही उद्देश नाही पण सरकारच आम्हाला राजकारणात ढकलत आहे. आम्ही पहिल्या टप्प्यात 24 मतदारसंघाची चाचपणी केली आहे. आम्ही शोध घेत आहे. आम्ही शांत का बसावे? कोणत्याही समाजावर अन्याय नाही झाला पाहिजे. इतर समाजांनी देखील आमच्यासोबत आले पाहिजे, यासाठी चाचपणी करत आहे.

सरकारने आरक्षण दिल नाही तर जरांगे विधानसभा निवडणुकीत लढवणार आहे. 127 मतदारसंघात पहिला सर्व्हे केला आहे. इतर मतदारसंघात आणखी दुसरा सर्व्हे करणार आहे. आरक्षण नाही दिले तर वेळ आली तर जरांगे मराठा, मुस्लिम आणि दलित , लिंगायत यांची मोट बांधून निवडणूक लढवणार आहे. मी स्वतः निवडणूक लढवणार नाही . स्वतःचा पक्ष की अपक्ष हे अजून ठरवलं नाही. मी सर्व मतदारसंघात जाणार आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.6 जुलैपासून मराठवड्यात प्रत्येक जिल्ह्यात शांतता जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. 6 जुलै हिंगोली, 7 जुलै परभणी, 8 जुलै नांदेड, 9 जुलै लातूर, 10 जुलै धाराशिव, 11 जुलै बीड 12 जुलै जालना, 13 जुलै संभाजीनगर जिल्ह्यात रॅली असणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!