उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी गैरसमजात राहू नये. तुम्ही 10 टक्के आरक्षण दिले फजिती सुरू आहे. मी फडवणीस यांच्या शब्दाला विरोध करत नाही. महाविकास आघाडीनेही आमचे प्रचंड नुकसान केले आहे.मात्र तुम्ही आता नुकसान केले आणि त्यांनी अगोदर केले. गुन्हे मागे घ्या सगे सोयरे मान्य करा, आम्हाला आरक्षण पाहिजे. कशाला उगाच मराठ्याच्या अंगावर घेता. आम्ही म्हणत नाहीत मविआ चांगली आहे आणि महा युती वाईट आहे आमचे आम्हाला आरक्षण द्या. आम्हाला राजकारण करायचे नाही. जर आरक्षण द्यायचं नसेलच तर आम्ही विधानसभेला 288 जागा लढवू. मनोज जरांगेच्या नादी लागू नका, दखल घ्यायची नसेल तर लवकरच प्रेस घेत 288 उमेदवार कोण? मतदान कसं होणार? हे सांगणार, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
आमच्या गोर गरिबांचे मते घेऊन कोण बदलते हे आम्हाला माहीत आहे. तुम्ही आम्हाला ठरल्या प्रमाणे आरक्षण दिले नाही, तर मी मागे लागलो तर सोडत नसतो. राजकारण तुम्हाला लख लाभ, आम्हाला आरक्षण पाहिजे. आम्ही त्यांना शत्रू मनात नाही, त्यांनी काय समजायचे ते समजावे. आम्ही त्यांना शत्रू मनात नाही, त्यांनी काय समजायचे ते समजावे. आता माझ्या मराठ्याच्या चपला सगट पाय पडत आहेत. त्यांनी आरक्षण दिले नाही तर विधान सभेला मजाच बघा, असंही जरांगे म्हणाले.
आम्हाला आमच्या हक्काचं, टिकणारं ५० टक्क्याच्या आतमधील ओबीसीमधील आरक्षण द्या. केसेस मागे घ्या आणि हैदराबादचं गॅजेट लागू करा आणि आरक्षण द्या. आमचं काम तुम्ही नाही केलं तर आम्ही पाहू. आम्ही गावखेड्यातील ओबीसी-मराठा एकत्र आहोत. मी आचारसंहितेचा सन्मान केलाय. आरक्षण मिळायला नको म्हणून कोण आडवं येत आहे हे आम्हाला माहिती असल्याचं म्हणत जरागेंनी सांगितलं.दरम्यान, मराठा आरक्षणासाठी आता जरांगे आतापासूनच विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे. आता मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय पाऊलं उचलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.