
सरकार फक्त खोटं आश्वासन देत वेळ मारून नेत आहे. यांचे डाव आम्ही ओळखले आहेत. त्यामुळेच मराठा समाजाचा रोष आता रस्त्यारस्त्यावर दिसत आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप मंत्री गिरीश महाजन हे मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण करत आहेत, आता फक्त संघर्ष होणार असल्याचे वक्तव्य मराठा आंदोलन मनोज जरंगे पाटील यांनी लातूरमध्ये व्यक्त केले आहे.आज मराठा आरक्षण शांतता रॅलीसाठी मराठा आंदोलन मनोज जरांगे यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा समाज लातूरच्या रस्त्यांवर उतरला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपने ते गिरीश महाजन हे मराठा व ओबीसी समाजात तेढ निर्माण करत असून यांचा डाव आम्ही ओळखला आहे. याची माहिती समाजाला आहे. त्यामुळे आता फक्त संघर्ष होणार असल्याचा इशारा जरांगे यांनी केला.मराठा आरक्षणाविषयी मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील आज लातूर शहरात आहेत. मराठा आरक्षण शांतता रॅलीसाठी लातूर जिल्ह्यातील दहा तालुक्यातील अडीच लाखांहून अधिक मराठा समाज शहरात दाखल होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. शहरात या शांतता रॅलीचे जंगी स्वागत करण्यात आले आहे. शहरात काही ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील रॅलीसाठी 2000 पुरुष स्वयंसेवक आणि 400 महिला स्वयंसेवकांची फळी सज्ज ठेवण्यात आली होती.
लातूर शहरात आज होणाऱ्या मराठा आंदोलन मनोज जरांगे यांच्या रॅलीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. लातूर शहरात प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी स्वामी विवेकानंद पुतळ्याला व त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. शाहू चौकातील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर खऱ्या अर्थाने शांतता रॅली सुरू होऊन त्यानंतर ते गंजगोलाईकडे मार्गस्थ झाली. त्यानंतर आंबेडकर पार्कवरून छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीचा समारोप आंदोलन मनोज जरंगे पाटील करतील.