Latest Marathi News
Ganesh J GIF

“माऊली आबा कटके एक संघर्ष करणारे नेतृत्व” – माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील

(हवेली प्रतिनिधी – चंद्रकांत दुडे) – आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास घेतलेले, स्वच्छ प्रतिमा असणारे तरुण तडफदार माऊली आबा कटके हे सर्वसामान्यांना त्यांचा हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करणारे नेतृत्व आहे. या नेतृत्वाला तुमच्या सर्वांची साथ मिळाल्यावर या भागाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. पुणे जिल्हा परिषदेत काम करताना त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवून दिलेली आहे, असे गौरवाद्गार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी काढले.

आढळराव पाटील म्हणाले, राज्यात महायुतीचे सरकार येणार असून आपल्या हक्काचा आमदार विधानसभेत पाठविल्यानंतर या भागातील ज्वलंत प्रश्न सोडवण्याचे आणि विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे काम माऊली (आबा) कटके करणार आहेत. त्यामुळे आपल्या सर्वांच्या साथीने माऊली आबा कटके यांचे हात बळकट करून त्यांना शिरूर-हवेलीच्या आमदार पदी निवडून देण्याची जबाबदारी आपण सर्वांनी घ्यावी.

शिरूर-हवेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार माऊली (आबा) कटके यांचा झंझावाती प्रचार दौरा झाला. यावेळी कोरेगाव भीमा, वाडा गावठाण, सणसवाडी, देरकरवाडी, कांढापुरी, करंजावणे, भांबर्डे, राऊतवाडी-वाबळेवाडी शिक्रापूर परिसरात गावभेट दौर्‍यामध्ये नागरिकांशी संवाद साधला. यावेळी दरेकरवाडी येथे झालेल्या कोपरासभेत आढळराव पाटील बोलत होते. गावागावांमध्ये जेसीबीतून फुलांची उधळण करीत, झांज-लेझीमच्या तालावर जल्लोषात स्वागत केले. याप्रसंगी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट), भाजप, रिपाइं व मित्र पक्षांतील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सणसवाडी येथे पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत महिला व तरूणवर्ग मोठ्या संख्सयेने सहभागी झाला होता. दरम्यान माऊली कटे यांनी लेझीम झांज पथकासोबत सहभागी होत, ताल धरला.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!